लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय करीत आहे, अशा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची विशेष सभा रविवारी घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना कायदा आपल्या बाजुने आहे. कुणाच्याही दबावाला किंवा फसव्या आमिषाला शेतकºयांनी बळी पडण्याची गरज नाही. आपला निर्धार आणि एकजुट असली तरच शासनाकडून आपण कायदेशीर संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य करू घेऊ शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.अनेक शेतकऱ्यांवर जमिनींची किंमत ठरवताना अन्याय झाला आहे. त्यांनी आपली निवेदने देवून आपल्या जमिनीचे मोल पुर्णपणे घ्यावे. त्यासाठी आपण पुन्हा संघर्ष करण्यासाठी तयार आहो असेही यावेळी प्रा. गमे यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांसह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सभेत ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी जाणार आहे त्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले. याप्रसंगी अॅड. महेंद्र धोटे यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच प्रा. सय्यद, विनय डहाके, जीतेंद्र गोरडे, निळकंठ राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला राजेंद्र झिले, विनोद पारिसे, लुकेश सावरकर, संतोष डोळे, प्रवीण झाडे, अनिल गळहाट, मनोहर गोंडाने, गोविंद मेहरे, सुभाष भोयर, गुणवंत धामले, रमेश उरकुडे, देवानंद कनेरी, वंजारी यांच्यासह विरूळ, रसुलाबाद भागातील शेतकरी हजर होते.योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलनविरुळ येथे पार पडलेल्या विशेष सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कायदे तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अॅड. महेंद्र धोटे यांनी कुठल्याही आमिषांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. इतकेच नव्हे तर सभेदरम्यान ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी संपादीत होणार आहे त्यांना योग्य मोबदला न दिल्यास रस्त्यावर येत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:10 PM
लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय ...
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा निर्धार : विरूळ येथील शेतकरी सभा