लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विद्यार्थी चार भिंतींबाहेर जास्त वेळ फक्त शाळेतच राहत असतो. त्यामुळे केवळ शालेय परिसरच हा स्वच्छ असून चालत नाही, तर शाळेचे बाह्यांग-अंतरंगही सुंदर आणि शैक्षणिक प्रेरणा देणारे असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांमध्ये सुंदर, स्वच्छ आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आनंददायी शिक्षणांतर्गत ‘बाला’ संकल्पना (बिल्डिंग अॅज लर्निंग एड) राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३ जून रोजी आढावा बैठक घेतली. मागील वर्षामध्ये शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन तंत्राचा अवलंब केला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. विद्यार्थी हा शाळेतच जास्त वेळ राहत असल्याने शाळेत आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. याच संकल्पनेतून अत्यंत कमी खर्चामध्ये ‘बाला’ ही संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे. या संकल्पनेतून शाळेमधील उपलब्ध जागा आणि इमारतीचा विचार करून विशिष्ट जागांमध्ये अभिनव बदल करणे, कल्पकतेने दारे, खिडक्या, फरशी, छत, भिंती, व्हरांडा, स्वच्छतागृह, हॅन्डवॉश स्टेशन व मैदाने यांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करण्यावर भर दिला जाणार असल्याने शाळा परिसर बोलका होणार आहे.
असे करावे लागणार बदल
इमारत
- शालेय गेट ते वर्गखोली पर्यंतचे अंतर मोजणे- खिडकीची प्रत्यक्ष लांबी, रुंदी, उंची मोजणे- घड्याळासह वर्गातील दिनदर्शिका तयार करणे- पाण्याच्या टाकीचे वास्तव आकारमान वजन काढणे
वर्गखाेली
- दरवाजाच्या खालील फरशीवर कोन आख- अक्षर लिपीच्या आकाराचे तक्ते तयार करणे- वर्गातील पंखे रंगचक्राने (ता.ना.हि.पा.नि.पि.जा) रंगविणे- अपूर्णांकासाठी विविध साधने तयार करणे.- चौकडीचे फळे, ठिपक्याचे फळे तयार करणे- छतावर अवकाशीय ग्रहमाला सूर्यग्रहण चंद्रगहण तयार करणे
मैदान
- आवारातील पडीक जागेचा वापर ओटे बांधून करणे.- दोन इमारती मधील जागेचा वापर कल्पकतेने करणे,- जुन्या टायरचा वापर करुन मुलांच्या अतिरिक्त उर्जेचे समायोजन करणे- देशाचा नकाशा विटांनी बांधून त्यात माती वाळू टाकून त्याचा भौगोलिक अभ्यासासाठी वापर करणे,- ध्वजस्तंभाच्या सरकणाºया सावलीचा सौरघडयाळ ग्रहांच्या भ्रमणकक्षा म्हणून वापर करणे.- नैसर्गिक वातावरणासाठी वनस्पती उद्यान करून त्यातील झाडांना नावाच्या पाट्या लावणे.- छतावर पांढरा रंग देऊन सूर्याची उष्णता परावर्तीत करणे- डेरेदार वृक्षांची आग्नेय, दक्षिण, पश्चिम दिशेस लागवड करुन संगोपन करणे.- डेरेदार