शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

न.प. मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आठवडी बाजारातील समस्यांचा आढावा

By admin | Published: July 22, 2016 1:51 AM

शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यात असून आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य आहे.

वृत्ताची दखल : चिखल, घाण पाहून अधिकारीही अवाक् हिंगणघाट : शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यात असून आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत बुधवारी न.प. मुख्याधिकाऱ्यांनी आठवडी बाजार परिसराची पाहणी करीत समस्यांचा आढावा घेतला. यावेळी व्यापारी व ग्राहकांनी त्यांच्यापूढे समस्यांचा पाढा वाचला. न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी आठवडी बाजार आणि भाजी बाजाराला बुधवारी भेट देत पाहणी केली. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाहीही दिली. शहरातील खड्डे, चिखल व घाणीचे साम्राज्य याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. यातून नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावरून न.प. मुख्याधिकारी अनिल जगताप व आपचे मनोज रूपारेल यांनी बाजार परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. आठवडी बाजारातील चिखल, घाण, अस्वच्छतेची तसेच प्राथमिक सुविधा नसल्याचे लक्षात आणून दिले. अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरण निदर्शनास आल्यानंतर लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी जगताप यांनी सांगितले. श्रीराम टॉकीज ते अभ्यंकर शाळा मार्गावर भाजी बाजाराचे अतिक्रमण झाल्याने जुन्या वस्तीतील ६ वॉर्डातील नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. हा हा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. याप्रसंगी नागरिक, व्यापारी व तक्रारदार उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)