लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोविड-१९ च्या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाच्यावतीने पूर्णत: स्वयंचलित नर्सिंग रोबोट तयार केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून साकारलेले हे यंत्र आता कोरोनाच्या लढ्यात सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून स्वास्थ दूत म्हणून सज्ज झाले आहे.महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय परिवारातील सदस्य अपर्णेश शुक्ल यांनी हा रोबोट तयार केला असून ते ग्वालियर येथे एबीएमचे शिक्षण घेत आहे. होळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी ते वर्ध्यात आले आणि लॉकडाऊनमुळे येथेच अडकले. या कालावधीत कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यालाही लागण होण्याचा धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिच बाब लक्षात घेऊन कोरोना आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांना मदतगार म्हणून नर्सिंग रोबोट तयार करण्याची संकल्पना अपर्णेश शुक्ल यांच्या मनात आली. त्यांनी लगेच विश्वविद्यालयातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंपासून रोबोट तयार केला. १३ किलो वजनाचा हा रोबोट शारीरिक व सामाजिक अंतर ठेऊन २५ किलो पर्यंतची आवश्यक सर्व सामग्री रुग्णांपर्यंत पोहोचविण्यास मदत करतो. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात हा रोबोट फार महत्त्वाचा ठरणार आहे. असे यंत्र तयार करणारा वर्धा जिल्हा हा पहिलाच असून भविष्यात या यंत्राला ३६० डिग्री कॅमेरा, सेंसर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू लावून अधिक अत्याधुनिक बनविले जाईल, असा विश्वास अपर्णेश शुक्ल यांनी व्यक्त केला.सामान्य रुग्णालयाला अशा प्रकारचे यंत्र प्राप्त होणारा वर्धा जिल्हा हा पहिलाच आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे यंत्र खूप उपयोगी पडणार आहे. रुग्णांजवळ न जाता त्यांचा उपचार करणे आणि त्याला आवश्यक ती मदत देण्यासाठी तयार केलेले हे यंत्र खऱ्या अर्थाने स्वास्थ दूत ठरेल.- सुनील कोरडे, निवासी जिल्हाधिकारी, वर्धा.सामान्य रुग्णालयाला नि: शुल्क भेटहिंदी विश्वविद्यालय परिसरात निर्माण केलेला स्वयंचलित नर्सिंग रोबोट वध्यार्तील जिल्हा सामान्य रुग्णालयाला नि:शुल्क भेट देण्यात आला. रुग्णालयातील एका कार्यक्रमात या रोबोटचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, डॉ. अनुपम हिवलेकर, रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे यांच्यासह विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, सहायक कुलसचिव डॉ. राजेश्वर सिंह यांची उपस्थिती होती.
कोरोनाशी लढा देण्यासाठी वर्ध्यात साकारला नर्सिंग रोबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 7:32 PM
कोविड-१९ च्या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाच्यावतीने पूर्णत: स्वयंचलित नर्सिंग रोबोट तयार केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून साकारलेले हे यंत्र आता कोरोनाच्या लढ्यात सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून स्वास्थ दूत म्हणून सज्ज झाले आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये निर्मितीहिंदी विश्वविद्यालय परिवारातील अपर्णेश शुक्ल यांची कामगिरी