लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : येथील शेतकरी सिद्धार्थ तायडे यांच्या टेंभा मौजातील शेतावर शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून शासनाने भूसंपादित केलेल्या ०.८१ हे.आर. जमीचा कब्जा भीमराव गोमाजी काळबांडे यांना देऊन संत्राची झाडे तोडल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला.करणू लहानू ढवळे यांची टेंभा मौजा सर्र्व्हेे नं. १०/१ मध्ये ४.२३ हे. आर जमीन होती त्यापैकी ०.८१ हे. आर जमीन सन १९८१ मध्ये लेव्हीत देण्यात आली होती. व ती जमीन सन १९८३ मध्ये शासनाने भुसंपादीत केली होती.व त्यानंतर उर्वरित जमीन पैकी सन १९८६ मध्ये सिद्धार्थ देवमन तायडे यांनी १.८० हे.आर.जमीन उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भागाकडून विकत घेतली तर दिनकर नामदेव तायडे यांनी १.२१ हे.आर.जमीन उत्तर दक्षिण धुरा पाडुन पूर्वेकडील भागाकडून ढवळे यांच्याकडुन दोघा तायडे बंधूंनी एकूण ३.०१ हे. आर जमीन विकत घेतली. उर्वरित जमिनी पैकी ०.२५ हे. आर जमीन ढवळे यांनी त्यांचा भाचा सिद्धार्थ तायडे यांना मृत्युपत्र करून दिले. सिद्धार्थ तायडे व दिनकर तायडे सदर जमीनीचा फेरफार करवून घेऊन आपापल्या नावाने तलाठी रेकार्डला दोघांनीही नावाची नोेंद करून घेतली. तेव्हापासून ती सिद्धार्थ तायडे यांच्या मालकी व कब्जात मौजा टेंभा नवीन सर्वे नं अ. क्र. ७१/१ व ७१/२ यांच्या कब्जात आहे. त्याची आराजी ०.२५ हे.आर. तसेच १.८१ हे.आर. अशी आहे. शेत सर्व्हे नं. ७१/३ दिनकर नामदेव तायडे यांचे कब्जात आहे. तर सिद्धार्थ तायडे यांच्या कब्जात असलेल्या जमीनीत संत्रा झाडे लावलेली आहे. शासनाने भुसंपादीत केलेली सर्वे क्र. ७१/४, ०.८१ हे. आर जमीन मागील वर्षी प्रकल्पग्रस्त लाभार्थी भीमराव गोमाजी काळबांडे यांना वाटप करण्यात आली परतु सदर जमीन ही सिद्धार्थ तायडे व दिनकर तायडे यांच्या कब्जात असल्याचे त्यांना दिसले तेव्हा काळबांडे यांनी त्याची सबंधित कार्यालयात रितसर तक्रार करून शेताची मोजणी करण्याची मागणी केली. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडुन २८ डिसेंबर २०१८ ला मोजणी करण्यात येणार असल्याचे तायडे यांना माहिती पडले; परंतु सिद्धार्थ तायडे यांच्या कब्जात शेत सर्वे क्र. ७१/१ व ७१/२ असुन त्यांना त्या मोजणीचा नोटीस देण्यात आलेला नसल्याचे सिद्धार्थ तायडे यांचे म्हणणे आहे. सदर मोजणीच्या अनुषंगाने दर्शविलेल्या सीमा चुकीच्या असल्याचे भूमिअभिलेख कार्यालयाला वकिलामार्फत कळविले आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणात ही कार्यवाही झाली असल्याचे सिद्धार्थ तायडे यांचे म्हणणे आहे.जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्त लाभार्थ्याला ताबा पावती देऊन सीमांकन मुकरर करून दिली. तेथील वस्तुस्थिती निदर्शनात आणून दिली. हे प्रकरण मागील एक वर्षांपासून सुरू असून लाभार्थ्याने केलेल्या तक्रारीवरून वरिष्ठांच्ता आदेशानुसार कार्यवाही करण्यात आली.- रणजित देशमुख, नायब तहसीलदार, आष्टी.तायडे यांनी शेत विकत घेण्याअगोदर ज्या मूळ मालकाची एकंदर जमीन होती, त्यापैकी मुळमालकाकडूनच ०.८१ हे.आर. जमीन १९८१ मध्ये लेव्ही संपादन केली होती. आणि १९८३ मध्ये शासनाने भूसंपादन केली होती त्याची कागदपत्र व नकाशा शासनाच्या नावे असून ती जमीन तायडे यांच्या कब्जात होती व त्यावर संत्रा झाडे लावली होती. नकाशानुसार ०.८१ हे.आर. जमिन मोजून देऊन काढून देण्यात आली.- मोटघरे, भूमापक भूमी अभिलेख, आष्टी.मूळ मालकाकडून खरेदी केलेली जमीन माझ्या खरेदी दस्तएवजामध्ये नमूद असलेल्या आराजी नुसार व चतु:सीमेप्रमाणे खरेदी हक्कानुसार माझ्या वाहितीत आहे. त्यावर कोणाचाही कब्जा नाही. माझ्या खरेदीनुसार माझी आराजी जास्त असेल तर ती जमीन शासनाने घ्यावी; परंतु खरेदी केलेल्या चतुरसीमेप्रमाणे माझ्या जमिनीवर माझाच हक्क राहील.- सिद्धार्थ देवमन तायडे, तळेगाव (श्या.पं.).
शेतावर कब्जा ; संत्रा झाडे तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:21 PM
येथील शेतकरी सिद्धार्थ तायडे यांच्या टेंभा मौजातील शेतावर शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून शासनाने भूसंपादित केलेल्या ०.८१ हे.आर. जमीचा कब्जा भीमराव गोमाजी काळबांडे यांना देऊन संत्राची झाडे तोडल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला.
ठळक मुद्देतायडे यांचा आरोप : न्यायप्रविष्ट प्रकरणात कारवाई