लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक पं.स.च्या मासिक सभेत अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागाला पत्रही पाठविण्यात आले; पण सुधारणा होत नसल्याने शनिवारी घेण्यात आलेली मासिक सभाही स्थगित करुन मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पदाधिकारी केली आहे.पं.स. च्या सभागृहात गुरुवारी सकाळी मासिक सभा होऊ घातली होती. पं.स. च्या गट विकास अधिकारी स्वाती ईसाये यांच्या अनुपस्थितीत सचिव म्हणून विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. पं.स. सभापती महानंदा ताकसांडे यांच्या अध्यक्षतेत सभेला सुरुवात झाली. विभागनिहाय कामाचा आढावा सुरु असताना लेखा विभागाने सन २०१८-१९ चे अंतीम सुधारीत अंदाजपत्रक व २०१९-२० चे मुळ अंदाज पत्रक सादर केले. यावेळी नेहमीप्रमाणे तहसील कार्यालय, महावितरण, कृषी विभाग, वनीकरण व परिवहन महामंडळ यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या कशा सोडवायच्या. त्यांच्या समस्यांचे अधिकाºयांकडून निराकरण कसे करुन घ्यायचे, असे प्रश्न सभागृहात सदस्यांनी लावून धरले. अखेर योग्य उत्तर मिळत नसल्याने संतप्त सदस्यांनी अर्ध्यातासातच सभा स्थगिक करुन सभागृह सोडले. यावेळी पं.स.चे उपसभापती सुभाष चांभारे, पं.स. सदस्य राजु डोळसकर, संदीप किटे, महेश आगे, प्रशांत चौधरी, प्रमोद लाडे, भगत, इरपाचे, रंगारी, सराफ, मून, सडमाके आदींची उपस्थिती होती.पं.स.च्या मासिक सभेला नेहमीच तहसील कार्यालय, कृषी विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असते. याबाबत सभागृहात वारंवार सूचना व पत्रही देण्यात आले आहे; पण अधिकारी उपस्थितच राहत नसल्याने त्यांना फक्त कार्यालयीन कामकाजाकरिता लागणाºया मंजुऱ्या सदस्य या नात्याने का द्याव्यात? नागरिकांच्या समस्याबाबत उदासिन असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करणे अपेक्षीत आहे.- राजू डोळसकर, पं.स. सदस्य वर्धा.
अधिकाऱ्यांची दांडी पदाधिकारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:11 AM
स्थानिक पं.स.च्या मासिक सभेत अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागाला पत्रही पाठविण्यात आले; ...
ठळक मुद्देपंचायत समितीतील प्रकार : सदस्य संतप्त, मासिक सभा स्थगित