लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने केलेल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या चमूने दररोजचा खर्चविषयक अहवाल खर्च चमूला सादर करावा, असे निर्देश वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक काशीनाथ झा यांनी दिलेत.निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या खर्चाची माहिती संकलित करणाऱ्या विविध नोडल अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, निवडणूक खर्च नोडल अधिकारी शेळके, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, माध्यम सनियंत्रण नोडल अधिकारी मनीषा सावळे, आयकर विभाग, पोलीस विभाग आणि सह्ययक खर्च निरीक्षक, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी विवेक इलमे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.बैठकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामाची माहिती समजून घेतली. यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी आतापर्यंत जिल्ह्यात रोख रक्कम, शस्त्र जप्ती, मद्य आणि गुन्ह्यासंदर्भात आणि निवडणुकीमध्ये आवश्यक कर्मचाºयांची माहिती दिली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रेत्यांवरील कारवाईची माहिती दिली.निवडणूक खर्च नोडल अधिकारी यांनी सर्व विभागांकडून खर्चविषयक माहिती रोज संकलित करीत असल्याचे सांगितले. यावेळी झा यांनी वर्धा हा दारूबंदी असलेला जिल्हा असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दारूवर नजर ठेवावी आणि कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. सर्वांनी स्वत:चे आयकार्ड सोबत ठेवावे अशा सूचनाही त्यांनी केल्यात. मनीषा सावळे यांनी प्रसारमाध्यम कक्ष तयार करण्यात आला असून रोज जिल्ह्यात येणारे आणि जिल्ह्यातून प्रकाशित होणारी वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवर देखरेख करण्याचे काम सुरू असून खर्चविषयक अहवाल दररोज पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी लोकसभा निवडणुकीसंबंधी पॉवर पॉइंट सादरीकरण केले.
अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या खर्चाची माहिती द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:17 AM
वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने केलेल्या खर्चाची माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी आणि त्यांच्या चमूने दररोजचा खर्चविषयक अहवाल खर्च चमूला सादर करावा, असे निर्देश वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक काशीनाथ झा यांनी दिलेत.
ठळक मुद्देकाशीनाथ झा : विविध नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा घेतला आढावा