शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्हा प्रशासनाला जुन्यांचा मोह सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:26 AM

जिल्हा प्रशासनाच्या कामाला गती मिळावी. शिवाय कुठल्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर कुठल्या विभागाची जबाबदारी आहे याची माहिती मोबाईल व इंटरनेटचा वापर करून घरबसल्या नागरिकांना मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वर्धा डॉट गो डॉट इन’ ही वेबसाईट तयार करण्यात आली.

ठळक मुद्देचुकींचा प्रसार : ‘वर्धा डॉट गो इन’ संकेतस्थळाचे वास्तव

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाच्या कामाला गती मिळावी. शिवाय कुठल्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर कुठल्या विभागाची जबाबदारी आहे याची माहिती मोबाईल व इंटरनेटचा वापर करून घरबसल्या नागरिकांना मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वर्धा डॉट गो डॉट इन’ ही वेबसाईट तयार करण्यात आली. परंतु, सध्या याच वेबसाईटच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार होत असल्याने आणि त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने सुजाण नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे तातडीने योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची अमरावती येथे बदली होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर जिल्हाधिकारी म्हणून सध्या त्यांचेच नाव कायम आहे. इतकेच नव्हे तर याच संकेत स्थळावर निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य, उपजिल्हाधिकारी निम्न वर्धा, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यरत राहिलेल्या राजलक्ष्मी शाह यांचे नाव बदली होऊनही कायम असल्याचे दिसते. तर उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून वर्धेत रुजू झालेल्या उत्तम दिघे यांच्या नावासमोर उपजिल्हाधिकारी रोहयो असा मजकूर नमुद करण्यात आला आहे. शिवाय उपजिल्हाधिकारी भूमी (विमाविप) चंद्रभान पराते यांना पदोन्नती मिळत त्यांची नागपूर येथे बदली झाली आहे. परंतु, त्यांचेही नाम या संकेतस्थळावर कायम असल्याचे दिसून येते. तसेच उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची बदली होऊन त्यांच्या जागी उत्तम दिघे हे रुजू होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटूनही खंडाईत यांचे नाव कायम असल्याचे बघावयास मिळते. तर देवळीच्या तहसीलदार बाळू भागवत यांची बदली होऊनही सदर संकेतस्थळावर त्यांचे नाव कायम आहे. तर आष्टी (शहीद)च्या तहसीलदार बदलल्या असताना सीमा गजभिये यांचे नाव या संकेतस्थळावर कायम आहे.हिंगणघाट येथे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून खंडाईत रुजू झाले असले तरी अद्यापती पूर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे यांचे नाव कायम आहे. तर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस यांची बदली होऊन डॉ. बसवराज तेली हे वर्धेत पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होऊनही तशी सुधारणा या संकेत स्थळावर घेण्यात आलेली नाही. या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.सेलू नगरपंचायत हरवलीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या या संकेतस्थळावर नगरपालिका या आॅपशनवर क्लिक केल्यावर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची माहिती मिळते. परंतु, याच ठिकाणावर सध्या सेलू या नगरपंचायतीची नोंद घेण्यात आली नसल्याचे सेलू नगरपंचायतच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून हरविल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.स्वयंसेवी संस्था दोनच कशा?जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सदर संकेत स्थळावर निसर्ग सेवा समिती आणि सद्भावना या दोनच स्वयंसेवी संस्था वर्धा जिल्ह्यात असल्याची नोंद घेण्यात आली आहे. वास्तवीक पाहता वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचा आकडा हा सुमारे २० च्या घरात आहे. तर याच संकेतस्थळावर केवळ तीन बँकांची नोंद घेण्यात आली असून वास्तविक पाहता जिल्ह्यातील १६.३४ लाख नागरिकांचे विविध बँकेत खाते आहेत. एकट्या भारतीय स्टेट बँकेच्या वर्धा जिल्ह्यात सुमारे २९ शाखा असून ही बँक जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बँक आॅफ इंडिया ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून तिच्या सर्वाधिक शाखा जिल्ह्यात असल्याने संकेत स्थळावरील सध्याची माहिती नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारीच ठरत आहे.