शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जुन्या वादातून युवकाची हत्या

By admin | Published: July 01, 2014 1:37 AM

जुन्या वादातून युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शांतीनगर चौक परिसरात उघड झाली. विकेश उर्फ विक्की अरुण डंभारे

आरोपी फरार: सिंदी (मेघे) येथील थरारवर्धा : जुन्या वादातून युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शांतीनगर चौक परिसरात उघड झाली. विकेश उर्फ विक्की अरुण डंभारे रा. उमरी रोड सिंदी (मेघे) असे मृतकाचे नाव आहे. हत्या नेमकी कुणी केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शांतीनगर चौकात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पाहणी केली असता युवकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. मृतदेहाची पाहणी केली असता तो परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध घेतला असता त्याचे नाव विकेश डंभारे असे असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता पाठविला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ सुमेध डंभारे याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत विकेश डंभारे हा त्याच्या शेजारी राहत असलेल्या दिनेश पाटील याच्या पत्नीशी मध्यंतरी बोलत होता. या कारणावरून या दोघांत पुन्हा काल वाद झाला. हा वाद शाब्दीक होता. सायंकाळी तो वाद आटोक्यात आल्याचे साऱ्यांना वाटत होते. अशात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास दिनेश पाटील विकेशच्या घरी आला. त्याने विकेशला बाहेर येण्याचे सांगितले. तो बाहेर आल्यावर दिनेश त्याला दुचाकीवर बसवून घेवून गेला. तो रात्री परत आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. अशात सकाळी ७ वाजता शांतीनगर चौकात त्याचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याच्या तक्रारीवरून दिनेश पाटील व त्याचा भाऊ विनोद पाटील याच्यावर भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींच्या शोधात सेवाग्राम पोलीस फिरत असून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे; मात्र त्याची माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत.(प्रतिनिधी)