वर्धा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आष्टी शहीद येथून जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली होती. ५ रोजी जनसंवाद पदयात्रा देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात दाखल झाली. आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरुवात झाली. त्यांनी मार्गस्थ होत जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुलगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने पदयात्रा नाचणगाव होत देवळीकडे मार्गस्थ झाली.
सायंकाळी देवळी येथे जाहीर सभेने तिसऱ्या दिवसाच्या पदयात्रेचा समारोप होणार आहे. उद्या ६ रोजी पुन्हा देवळी येथून ही पदयात्रा वर्धेकडे रवाना होणार आहे. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण मार्गात आमदार रणजित कांबळे हे नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेताना दिसले.३ रोजीपासून आष्टी शहीद येथून ही पदयात्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुरु झाली. पदयात्रा नऊ दिवस जिल्ह्याच्या चारही विधानसभा मतदार संघात जाणार आहे. नऊ दिवसात एकूण सात तालुक्यात ही पदयात्रा जातं नागरिकांशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारने जनतेची केलेली पोलखोल समोर आणणार आहे.
१२ रोजी पदयात्रेचा समारोप सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात होणार आहे. जनसंवाद पदयात्रेत कमिटीच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष छोटू चांदुरकर, माजी नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर, बाजार समितीचे सभापती मनोज वसू, नाचणगाव ग्रा.पं.च्या सरपंच निलीमा राऊत, संजय देवगडे, कुशल चेंबुलवार, विकास ढोक, प्रमोद ठाकरे आदींसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.