प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता नियमित देयके अदा होणे महत्त्वाचे असते; पण बरेच ग्राहक नियमित विद्युत देयक अदा करीत नसल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या जिल्ह्यातही तशीच स्थिती निर्माण झाली असून उद्योग, व्यवसायांकडेच महावितरणची एक कोटी रुपयांची देयके थकित असल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जिल्ह्यात तीन विभाग आहे. यात आर्वी, वर्धा आणि हिंगणघाटचा समावेश आहे. या ग्राहकांना नियमित तथा उच्च दाबाची वीज पुरविण्याकरिता महावितरण अविरत प्रयत्नरत असते; पण याच ग्राहकांची विद्युत देयके थकित राहत असल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो. वर्धा जिल्ह्यातील ८०६ उद्योजक आणि २ हजार ५२६ व्यावसायिक ग्राहकांकडील विद्युत देयके अडकलेली आहेत. यापोटी महावितरणला १ कोटी १ लाख ४ हजार ५३० रुपये घेणे आहेत. ही रक्कम ३१ मार्चपूर्वी वसूल करण्याचे उद्दिष्ट होते; पण ती अद्याप वसूल झाली नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महावितरणला धडक वसुली मोहीम राबवावी लागत आहे. यात उद्योजक, व्यावसायिकांकडील वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.वर्धा जिल्ह्यातील ३ हजार ९५३ पैकी ८०६ उद्योजकांकडे ४६ लाख ५५ हजार १६३ रुपयांची वीज देयके थकित आहेत. महावितरणची सर्वाधिक थकबाकी हिंगणघाट विभागातील उद्योजकांकडे आहे. हिंगणघाट विभागातील ९८५ पैकी २६६ ग्राहकांकडे १८ लाख ८६ हजार ६१ रुपये थकित आहेत. वर्धा विभागातील १८८२ पैकी ३३८ ग्राहकांकडे १५ लाख ६१ हजार ७३२ तर आर्वी विभागातील १०८६ पैकी २०७ ग्राहकांकडे १२ लाख ७ हजार ३७० रुपये थकले आहेत. शिवाय व्यावसायिक मिटर घेणाऱ्या १८ हजार ३८२ पैकी २ हजार ५२६ ग्राहकांकडे विद्युत देयक थकले आहे. या ग्राहकांकडे ५४ लाख ४९ हजार ३६७ रुपयांची विद्युत देयके थकित आहेत. यात सर्वाधिक थकबाकी वर्धा विभागातील ९ हजार ३३८ पैकी १३२९ ग्राहकांकडे २४ लाख ९८७ रुपये आहे. आर्वी विभागातील ४ हजार ७८१ पैकी ८४३ ग्राहकांकडे १९ लाख ४६ हजार २८ रुपये तर हिंगणघाट विभागातील ४ हजार २१३ पैकी ३५४ ग्राहकांकडे ११ लाख २ हजार २५३ रुपयांची वीज देयके थकित आहे. उद्योजक, व व्यावसायिकांकडे तब्बल १.०१ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने सुरळीत वीज पुरवठा करण्यात अडचणी येत आहे. या ग्राहकांनी नियमित विद्युत देयकांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.वसुली पथकांनाही अपमानास्पद वागणूकमहावितरणकडून विद्युत देयकांची वसुली व्हावी म्हणून वसुली पथकाची निर्मिती केली जाते. यात उपअभियंत्यांसह कर्मचाºयांचा समावेश असतो. हे पथक सक्तीची वसुली करण्यासाठी जात असताना त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे काही प्रमाणात वसुली प्रलंबित राहत असल्याचे सांगितले जाते. या घटनांबाबत अनेक ठिकाणी तक्रारीही झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातही या तक्रारी आढळून येत असल्याने कर्मचारी वसुलीसाठी धजावत नसल्याचे दिसते. परिणामी, महावितरणची वसुली मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.
उद्योजक, व्यावसायिकांकडे एक कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:24 PM
महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता नियमित देयके अदा होणे महत्त्वाचे असते; पण बरेच ग्राहक नियमित विद्युत देयक अदा करीत नसल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो.
ठळक मुद्देविद्युत देयके थकल्याने महावितरण अडचणीत : धडक वसुली मोहीम राबविण्यावर भर