वर्धा: सध्या कोरोना व्हायरस या आजारामुळे अवघ्या जगात महामारीने थैमान घातले आहे. अशातच भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळेच वर्धा जिल्ह्यातील सर्व सरपंच व उपसरपंच यांनी देशाचे एक महिन्याचे मानधन कोरोना निर्मूलनासाठी देणार असल्याचे सरपंच संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत कळविले आहे. शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणावर कोरोना kovid-19 ला रोखण्याचा प्रयत्न करीत असतानाच न भूतो न भविष्यती असा नाइलाजास्तव लॉक डाऊन करण्याची परिस्थिती शासनावर आली आहे. देशावर मोठा आर्थिक भार येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने सुद्धा वैयक्तिक मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून मदतीचा ओघ असतांनाच आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्हा सरपंच संघटनेने देखील पुढाकार घेऊन वर्धा जिल्ह्यातील सर्व सरपंच व उपसरपंच त्यांना प्राप्त होत असलेल्या एक महिन्याचे संपूर्ण मानधन कोरोना या आजाराच्या निर्मूलन कार्याकरिता देणार असल्याचे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनीे सांगितले आहे. वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित एकही रुग्ण नाही अशी परिस्थिती असताना देखील. देशावर आलेलं संकट आपणा सर्वांच आहे हा उद्देश ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच प्रत्येक गावातील सरपंच तथा उपसरपंच यांनी आपण आपले एक महिन्याचे मानधन देणार असल्या संबधी पत्र आपल्या गट विकास अधिकारी यांचेकडे द्यावे. असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी केले आहे.
सरपंच व उपसरपंच यांचे एक महिन्याचे मानधन कोरोना व्हायरस निर्मुलनासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 4:48 PM