कारवाई : दुसऱ्या आरोपीची जामिनासाठी धडपडआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या बोरगाव गोंडी सहवनक्षेत्रात सापडलेल्या बेवारस सागप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बनावट कटाई आदेश प्रकरणातील आरोपीलाही १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यातील दोन फरार आरोपींपैकी एकाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे पोलीस सुत्राकडून सांगण्यात आले.सुसुंद खैराटी शिवारातील जंगलात क्षेत्र सहायक ए.एम. डेहनकर यांना ४३ हजार २३ रूपयांचा १ घनमिटर कटसाईज केलेला सागवान माल सापडला होता. वनविभागाने केवळ जप्तीची कारवाई करून प्रकरण गुंडाळले होते. लोकमतने वनविभागाच्या संशयास्पद भूमिकेबाबत वृत्त प्रकाशित करताच आरोपी अमोल मुरलीधर कोल्हे (२८) रा. सुसुंद यास अटक केली. त्यास न्यायालयापुढे हजर केले पण पोलीस कोठडीसाठी ठोस कारण न दिल्याने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. बेवारस साग प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. इतकी आखीव रेखीव कटसाईज करणे, झाड तोडणे, त्याला छाटणे व आऱ्याने जंगलातच कटसाईज तयार करणे, हे एकट्याचे काम नसल्याचे छायाचित्रावरुन लक्षात येते. साग चोरीला आळा घालण्यासाठी यातील आरोपींवर कडक कारवाई होते काय याकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
बेवारस सागप्रकरणी एकाला अटक
By admin | Published: June 05, 2015 2:10 AM