लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी तूर व कपाशी पिकाची लागवड केली आहे. इतकेच नव्हे, तर १ लाख २३ हजार ३१० मेट्रीक टन खतापैकी आतापर्यंत केवळ ५२ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. उर्वरित खत येत्या काही दिवसांत मिळेल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे.यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर तूर आणि कपाशी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. खरीप हंगामासाठी वर्धा जिल्ह्याला एकूण १ लाख २३ हजार ३१० मेट्रिक टन खताची गरज असून त्यापैकी ५२ हजार मेट्रिक टन खत शुक्रवारपर्यंत वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर शनिवारी हिंगणघाट येथे आणि रविवारी वर्धा रेल्वे स्थानकाच्या मालधक्यावर खताची रॅक लागली असून दोन्ही रॅकच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याला ३ हजार मेट्रीक टन खत मिळणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.येत्या दहा दिवसांत पाच रॅक लागण्याचा अंदाजआतापर्यंत एकूण ५२ हजार मेट्रिक टन खत वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर येत्या दहा ते पंधरा दिवसांत खताच्या पाच रॅक वर्धा जिल्ह्यातील रेल्वे विभागाच्या मालधक्क्यावर लागेल, असे कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले.खत कोंडी होईल काय?खरीप हंगामासाठी एकूण १ लाख २३ हजार ३१० मेट्रिक टन खताची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ ५२ हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा वर्धा जिल्ह्याला झाला आहे. येत्या काही दिवसांत रॅक लागून खतसाठा मिळेल असे बोलले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा झालेला खतसाठा कमी असल्याने जिल्ह्यात खत कोंडी होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
केवळ ५२ हजार मेट्रिक टन खत मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 5:00 AM
यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर तूर आणि कपाशी पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
ठळक मुद्दे१,८७६ हेक्टवर झाली कपाशी अन् तुरीची लागवड : उर्वरित खत वेळीच मिळण्याची शक्यता