लाेकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सुखामेवा घेवून जाणारा ट्रक उलटला होता. हे प्रकरण साफ बनावटी असल्याचे तसेच ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी प्रभावी नियोजन करूनच ट्रकमधील सुखामेव्याची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी संगणमत करून तब्बल ४० लाखांच्या सुख्यामेव्याचा अपहार केल्याचे पुढे आले आहे. ट्रक चालक जमीर अहेमद जमील अहेमद रा. नागपूर हा क्लिनर मोहम्मद जुबेर फजलानी मोहम्मद आरिफ फजलानी याला सोबत घेवून सुखामेवा भरलेला ट्रक घेवून जात होता. ट्रक सारवाडी शिवारात आला असता ट्रकचालकाने ट्रक पलटी झाल्याचा तसेच ग्रामस्थांनी सुखामेवा पळून नेल्याचा आव आणत तशी माहिती ट्रक मालकाला दिली. या प्रकरणी संशय आल्याने ट्रक मालकाने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात केली. प्रभारी ठाणेदार चांदे, हुसेन शहा, गजानन बावणे, अमोल मानमोडे, मनोज आसोले, राहुल अमुने यांनी तपासाला गती देत चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशीदरम्यान ट्रक चालकाने गवळीपुरा कामठी येथील नासिर जमाल अन्सारी व. वसिम अकरम अन्सारी यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे आरोपी यांनी संगणमत करून सदर ट्रकची मुळ नंबर प्लेट बदलवून दुसरी नंबर प्लेट क्र. एम. एच. ४० बी. जी. १५९९ ही बसवून ट्रकमधील किंमती बादामचे ३० किलो वजनाचे १०० पोटे व पिस्ता फ्रुटचा एक खोका व इतर माल इत्यादी किंमती मालाचा अपहार करून ट्रक पलटी करून ट्रकचे व किंमती मुद्देंमालाचे नुकसान केल्याचे पुढे आले आहे.
गुन्ह्याचा कट रचणारे फरारसदर गुन्ह्याचा कट रचणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक चमू नागपूर येथे रवाना करण्यात आली होती. पण या प्रकरणातील नागपूर येथील दोन्ही आरोपी पोलिसांना गवसलेले नाही.
फरार आरोपीस अटक करण्यासाठी घेताय माहीतीया प्रकरणी पोलिसांनी जमिर अहेमद जमिल अहेमद, तपसीर अहेमद जमिल अहेमद, मोहम्मद जुबेर फजलानी मोहम्मद आरिफ फजलानी, वसीम अकरम ताजमोहम्मद अन्सारी, मुंजमील उर्फ फाजील अहेमद फैयाज अहेमद, शेखर समीर उर्फ अत्तु अब्दुल रज्जाक यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडी मिळविली आहे. तर नासिर जमाल अन्सारी हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.उपराजधानीतून लागली नांदेड कनेक्शनची लिंकनागपूर येथे आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपी गवसले नसले तरी त्यांना याच गुन्ह्यासंदर्भातील नांदेड लिंकची माहिती मिळाली. त्यानंतर नांदेड येथे पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. तेथे शेर समीर उर्फ अत्तु अब्दुल रज्जाक याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली. त्यावेळी चोरीचा माल त्याने खरेदी केल्याचे पुढे आले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.