शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

लसीकरण झाले असेल तरच घराबाहेर पडा; ना प्रवास करता येणार, ना मॉलमध्ये खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 5:00 AM

लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असून, जिल्ह्यातील ९ लाख ६५ हजार व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख ४६ हजार ४५६ व्यक्तींनी लसीचा पहिला तर ४ लाख ४९ हजार २९ लाभार्थ्यांनी व्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूणच वर्धा जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ७८.७२ टक्के व्यक्तींचे अंशत: तर ४६.५३ टक्के लाभार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडचा नवीन उत्परिवर्तीत प्रकार ओमायक्रॉन याला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. वर्धा जिल्ह्यात या नवीन कोविड विषाणूची एन्ट्री होण्यापूर्वीच वर्धा जिल्हा अंशत: १०० टक्के व्हॅक्सिनेट कसा करता येईल यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग भर देत आहे. विशेष म्हणजे भविष्यातील कोविड संकट लक्षात घेता विविध ठिकाणी कोविड लस क्रमप्राप्त करण्यात आली आहे. काेविडची लस घेतलेल्यांनाच रेल्वेचा प्रवास तसेच मॉलमध्ये खरेदी करता येत असल्याने लसीकरण झाले असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असून, जिल्ह्यातील ९ लाख ६५ हजार व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख ४६ हजार ४५६ व्यक्तींनी लसीचा पहिला तर ४ लाख ४९ हजार २९ लाभार्थ्यांनी व्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूणच वर्धा जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ७८.७२ टक्के व्यक्तींचे अंशत: तर ४६.५३ टक्के लाभार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने काही नियमावली जाहीर केली आहे. यात शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांना मास्क क्रमप्राप्त, विविध धार्मिक तसेच पर्यटनस्थळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, कोविड लसीकरण आदींचा समावेश आहे. त्यामुळे लस घेतली नसेल तर विविध ठिकाणी एन्ट्रीच मिळणार नसल्याने तसेच काेविड लस ही कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असल्याने नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक व्हॅक्सिन घेणे गरजेचे आहे. तसे आवाहन आरोग्य विभाग करीत आहे.

बसचा प्रवास करणाऱ्यांचीही केली होतेय विचारणा-    रापम कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीला बऱ्यापैकी ब्रेक लागला असला तरी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने काही बसेस प्रवासी वाहतुकीसाठी सोडल्या जात आहेत. असे असले तरी बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना कोविडची लस घेतली काय याबाबतची विचारणा केली जात आहे. त्यामुळे सध्या लसीकरण हे गरजेचेच आहे.

दुर्लक्षीत धोरणामुळे जिल्ह्यात नाममात्रच कोविड टेस्ट- सन २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या नाममात्र कोविड टेस्ट केल्या जात आहेत. - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर आहे. मात्र जिल्ह्यात कधी पाच तर कधी केवळ ३७७ कोविड टेस्ट करण्यातच धन्यता मानली जात आहे.- त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

रेल्वे स्थानकावर एन्ट्री नाहीच-    कोविड संकट काळातही रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू असली तरी रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस क्रमप्राप्त करण्यात आली आहे. एकूणच लस घेतली नसलेल्यांना रेल्वे स्थानकावर एन्ट्रीच मिळत नाही.-    वर्धा शहरासह परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत काही मॉल आहेत. या ठिकाणी तोंडावर मास्क आणि कोविडची लस घेतली असलेल्यांनाच प्रवेश मिळतो.

...तर बाजारात साहित्यही मिळणार नाही

- लस घेतली नसेल तर बाजारपेठेत जीवनावश्यक साहित्यही मिळणार नाही अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत असली तरी त्याबाबतची कुठलीही सूचना जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेली नाही. असे असले तरी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

७५ हून अधिक केंद्रांवरून होतेय लसीकरण-    जिल्ह्यातील शहरी असो वा ग्रामीण भागातील एकही लाभार्थी कोविड प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये या हेतूने दररोज जिल्ह्यात किमान ७५ हून अधिक केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर  जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जि.प.च्या आरोग्य विभागाने     केले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या