लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील केळझर येथे असलेल्या आरोग्य केंद्रातले १८ कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने या संपूर्ण केंद्राचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आला आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथे आता एकच वैद्यकीय अधिकारी असल्याचे वास्तव आहे.या आरोग्य केंद्रात एकूण सहा आशा वर्कर्स काम करतात. मात्र मानधन देत नाही तोपर्यंत काम करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या व्यतिरिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते विलगीकरणात आहेत. या सर्व बाबींचा परिणाम गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.येथे माझ्यासोबत काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने विलगीकरणात आहेत. तर आशा सेविकांनी मानधन देणार असाल तरच काम करू अशी भूमिका घेतल्याने कामाचा सर्व भार माझ्या एकटीवर आला आहे.डॉ. पुष्पा छाडी,आरोग्य अधिकारी, केळझर.
वर्धा जिल्ह्यातील केळझरच्या आरोग्यकेंद्रात फक्त एकच अधिकारी; बाकी १८ जण कोरोनाग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 8:00 AM