लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचासह दहा सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती चूकीची आहे. राष्ट्रवादीच्या केवळ सरपंचानेच दबावाला बळी पडून भाजपात प्रवेश केला आहे. इतर सदस्य मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.भारतीय जनता पार्टीच्यावतीने म्हसाळ्याचे सरपंच संदीप पाटील यांच्यासह कल्पना मानकर, चंदा वाळके, धिरज वर्मा, पद्माकर नगराळे, अनिता टीपले, राजु धमाने, सुरेखा पानतावने, रेखा चव्हाण, जोत्सना गवळी व श्रीमती झाडे यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती तथ्यहीन आहेत. या ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य संख्या असून यातील एक जागा रिक्त असल्याने हल्ली १६ सदस्य आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस व समर्थित असे एकूण सात सदस्य असून १० सदस्य भाजपाकडे आहेत. त्यामुळे पुन्हा दहा सदस्यांनी प्रवेश केल्याचे सांगण्यात येत असल्याने बाकी सदस्य कोठून आले? असा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रवादीचे सरपंच पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे.उर्वरित सदस्य हे आमदार डॉ. पंकज भोयर यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यांना या प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नाही. विशेषत: ज्या सदस्यांची नावे घेण्यात आली त्यापैकी कल्पना मानकर, चंदा वाळके, पद्माकर नगराळे, अनिता टिपले, राजू दमाने, जोत्स्ना गवळी हे सर्व सदस्य सुरुवातीपासूनच भाजपाचे सदस्य आहेत. तर धिरज वर्मा, सुरेखा पानतावणे, रेखा झाडे व रेखा चव्हाण हे सर्व सदस्य आजही राष्ट्रवादी सोबत असल्याचे समीर देशमुख यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला माजी पंचायत समिती सभापती संदेश किटे, उपसरपंच अनिल उमाटे, प्रवीण बाकडे, सागर मरगडे, धीरज वर्मा, रेखा झाडे आदी सदस्यांची उपस्थिती होती.कारवाईच्या भीतीपोटी केला प्रवेशम्हसाळा ग्रामपंचायत विरुध्द जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार करुन सचिवांना निलंबित केले. त्यामुळे आता सरपंचावरही कारवाई केली जाईल असा धाक दाखविला जात होता. याच कारवाईच्या भितीपोटी सरपंच संदीप पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतल्याचा आरोपही समीर देशमुख यांनी केला आहे.
भाजपात केवळ सरपंचाचाच प्रवेश, सदस्य राकाँमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 11:24 PM
शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचासह दहा सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती चूकीची आहे. राष्ट्रवादीच्या केवळ सरपंचानेच दबावाला बळी पडून भाजपात प्रवेश केला आहे. इतर सदस्य मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देसमीर देशमुख : पत्रकार परिषदेत दिली माहिती