लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.डेंग्यू सदृश्य आजार सर्वत्रच बळावल्याने रुग्णालयातील गर्दीही वाढली. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयही हाऊसफुल्ल झाले आहे. सावंगी, सेवाग्राम रुग्णालयात जागेअभावी सध्या ५० लाखांपेक्षा कमी प्लेटलेट्स असलेल्यांनाच दाखल करुन घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिके च्यावतीने स्वच्छत करण्यात आली. १८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृतीही केली. तसेच फॉगींग व फवारणीही कमी करण्यात आली.परंतू नागरिकांनी अद्यापही मनावर घेतले नाही. ही जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि पालिकेवर लोटली जात असल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे प्रशासकीय यंत्रना व पालिकेसोबतच आपली जबाबदारी ओळखून आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली तर अशा आजाराला बळी पडावे लागणार नाही.घरातच डासांची उत्पत्तीवारंवार सूचना करुनही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने घरामध्येच मोठ्या प्रमाणात डेेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. घरामध्ये अजूनही कुलर लागले असून त्यात पाणी साचले आहे. घरातील पाण्याची टाकी कोरडी केली जात नाही. तसेच फ्र ीजमध्ये जमा होणारे पाणीही साफ केले जात नाही. व इतरही साठवून ठेवलेले पाणी कायम राहत असल्याने डासांची उत्पत्ती होत आहे.पोलिकेकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या. दोनदा फॉगींग करण्यात आले. फवारणीही झाली तसेच जनजागृतीही करण्यात आली.आता पुन्हा फॉगींग व फवारणी सुरु करण्यात येणार आहे.परंतू जोपर्यंत नागरिक स्वत: जागृत होणार नाही. तो पर्यंत या आजाराला आळा घालता येणार नाही. म्हणून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, न.प. वर्धा
दक्षता हीच खरी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:12 AM
पावसाअभावी वातावणातील बदलामुळे सध्या डेेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका व ग्रामपंचायतींनीही उपायोजना चालविल्या आहे.पण, तरीही आजार आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनीचे दुर्लक्षच याला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ठळक मुद्देनियंत्रणासाठी धडपड : शासकीय व खाजगी रूग्णालय हाऊसफुल्ल