लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पांढरे सोन म्हणून कपाशी पिकाची ओळख. परंतु, सध्या याच पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.मागील महिन्यात परतीच्या पावसाने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर टाकली. परंतु, सध्या अचानक कपाशीची पान पिवळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर बोंडही काळे येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हवालदील झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे. पुर्वीच परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीचे समाधानकारक उत्पन्न होईल, अशी आशा असताना पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.बोंड सडली, पांढऱ्या माशीसह तुडतुड्यांचा अटॅकचिकणी (जामणी) : गेल्या तीन महिन्यात पावसाने कपाशी उत्पादक शेतकºयांना सळो की पळो करून सोडले; पण पिकाचे योग्य पद्धतीने संगोपन केल्याने पिकाची वाढही बºयापैकी झाली. असे असले तरी सध्या अचानक कपाशी पीक पिवळे पडत आहे. शिवाय पांढऱ्या माशीचा तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव सध्या कपाशी पिकावर दिसून येत आहे. तर काही शेत शिवारात पाती गळ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर वयोवृद्ध शेतकºयांकडून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिसरातील काही कपाशीचे पीक पिवळे पडत आहे तर काही ठिकाणी झाडाला लागलेली बोंड काळी पडल्याचे चित्र बघावयास मिळते. त्यामुळे कपाशी पिकावर हा कुठल्या नवीन रोगाचा प्रादुर्भाव आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरडवाहू शेतकºयांना यंदा कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर होईल, असाही अंदाज सध्या वर्तविला जात आहे. शेतकºयांची अडचण लक्षात घेत कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी शिवार भेटी देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.मी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. सिंचनाची सोय असल्यामुळे कपाशी चांगली बहरली;पण अती पावसामुळे झाडाच्या खालच्या भागाचे बोंड काळे येत कुजत आहेत. असे का होत आहे हे आमच्या समजण्यापलीकडे आहे.- अमोल पारोदे, शेतकरी, चिकणी.सततच्या पावसामुळे शेत जमिनीची पाहिजे तशी मशागत झाली नाही. यामुळे सध्या जमीन कडक आली आहे. जमीन भुसभुसीत असली की मुळांना अन्न द्राव्य उत्तम प्रकारे मिळते. परंतु, सध्या कपाशीची पाती गळ होत आहे. त्यामुळे आमच्या अडचणीत भर पडली आहे.- विजय बेलसरे, शेतकरी, जामणी.यंदा अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कपाशीचे झाडाची वाढ बºयापैकी झाली. परंतु, बोंडे फारच बारीक आहेत. बारीक बोंड फुटत असल्यामुळे आणि कपाशी झाडावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव असल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.- विठ्ठल झोड, शेतकरी, चिकणी.अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखीसेवाग्राम : कपाशी पिकावर अद्यात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने परिसरातील कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर कपाशीची पाने अचानक पिवळी पडत असल्याने यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाला विलंब झाला. तर नंतर जो पाऊस झाला त्याने शेतकºयांना दिलासाच दिला. परंतु, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तर झालेला पाऊस तूर पिकासाठी फायद्याचा ठरला. असे असले तरी परतीच्या पावसानंतर सध्या कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.तुळजापूर येथील शेतकरी हेमंत जिकार यांच्या शेतातील चार एकरावरील कपाशीचे पीक सध्या पिवळे पडले आहे. त्यामुळे त्यांच्या संकटात भर पडली आहे. उभे पीक पिवळे पडत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.
पांढऱ्या सोन्यावर रोगांचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM
मागील महिन्यात परतीच्या पावसाने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर टाकली. परंतु, सध्या अचानक कपाशीची पान पिवळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर बोंडही काळे येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देआहेत पिवळी : उत्पादनात घट येण्याची शक्यता, कृषी विभागाबाबत वाढतोय रोष