लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील बसस्थानकासमोर गेल्या महिनाभरापासून खुलेआम गावठी व देशी दारूचे काऊंटर सुरू आहे. बेवड्यांच्या तर्रर्र नशेतील ताल पाहून काही व्यापाऱ्यांनी तक्रार केली असता त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली. शेवटी वातावरण तापल्यावर पोलिसांनी येवून दारूड्यांना पकडून नेल्यांचा प्रकार मंगळवारी घडला.खडकपूरा वॉर्ड बसस्थानकाच्या समोरच आहे. शिवाय दोन्ही बाजूला व्यापाऱ्यांची दुकाने आहे. याठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने पाच काऊंटर खुलेआम सुरू आहे. चकन्याची दुकाने लावून गुंडामध्ये प्युअर मोहाची दारू विकल्या जात आहे. येथे दारू पिण्यासाठी येणारे बेवडे नशेत आल्यावर व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. याप्रकरणी प्रथमेश अॅटो सर्व्हीसचे मालक गजानन डहाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांसमक्ष दारूविक्रेते व बेवड्यांची कहाणी कथन केल्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.त्यानंतर परसोडा, देलवाडी, लहान आर्वी, किन्ही व आष्टी येथील सात बेवड्यांनी लोटांगण घेत मोठा उपदव्याप केला. शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यामुळे वातावरण चांगलेच पेटले. प्रचंड संख्येनी नागरिक गोळा झाले. ठाणेदार जितेंद्र चांदे, जमादार इंगोले यांनी गृहरक्षकांच्या मदतीने सर्व बेवड्यांना गाडीत भरून नेले. हा प्रकार सराईत सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सडकून टिका केली आहे. युवा पिढी दारूच्या आहारी गेल्याने तरूणी व महिलांच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस दररोज हप्ता वसुलीसाठी येतात. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांना व्हिडीओ चित्रीकरण करून पुरावे पाठविण्यात आले आहे.चकन्याचे दुकान बंद कराबसस्थानक परिसरात पाच दुकानातून खुलेआम दारू विकतात. ती दुकाने तात्काळ बंद करा, अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. शालेय मुलींनी नाकाला रूमाल लावून दुसरा रस्ता सुरू केला आहे. पोलीस मात्र उपाययोजना करीत नाही. त्यामुळे जनआंदोलनाचा भडका उडणार असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बसस्थानकासमोर खुलेआम दारूचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 6:00 AM
चकन्याची दुकाने लावून गुंडामध्ये प्युअर मोहाची दारू विकल्या जात आहे. येथे दारू पिण्यासाठी येणारे बेवडे नशेत आल्यावर व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. याप्रकरणी प्रथमेश अॅटो सर्व्हीसचे मालक गजानन डहाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
ठळक मुद्देअश्लील शिवीगाळ : पोलिसांनी नेले दारूड्यांना पकडून