लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : साई पादुकांचे आगमन १९७५ व १९७८ नंतर वर्धेत होत असून शुक्रवार २ फेब्रुवारीला स्थानिक मगनवाडी भागातील साई मंदिरात श्रींच्या पादुका आणल्या जाणार आहेत. त्या भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात ेयेईल. त्याचा वर्धा शहरासह परिसरातील साई भक्ततांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत विठ्ठल व्यवहारे यांनी केले.व्यवहारे पुढे म्हणाले, शिर्डीचे सदगुरू साईबाबाच्या समाधी घटनेला आॅक्टोंबर २०१८ ला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने श्री साई संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीद्वारे आॅक्टोंबर २०१७ ते आॅक्टोंबर २०१८ हे वर्ष साईबाबा समाधी शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. इतकेच नव्हे तर जगभरातील साई मंदिरातही हा सोहळा पार पडत आहे. त्याचाच एक भाग म्हणून साईबाबांच्या मुळ पादुका देशभरातील साई भक्तांना दर्शनासाठी विविध गावांमधील साई मंदिरात अध्यात्मीक व ऐतिहासीक मूल्य सांभाळून नेल्या जात आहेत. श्रींच्या पादुका साई मंदिरात सकाळी ११ वाजता आणण्यात येईल. त्यानिमित्ताने केसरीमल कन्या शाळा ते साई मंदिरपर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत श्रींच्या पादुका दर्शनासाठी मंदिरात ठेवल्या जाईल. सायंकाळी ७ वा. साई भजन संध्येचा कार्यक्रम होईल, असेही ते म्हणाले. यावेळी घनश्याम सावळकर, नत्थुजी कुबडे, सुभाष राठी हजर होते.१०० स्वयंसेवक देणार सेवाश्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सुमारे सात हजार भाविक मंदिरात येण्याची शक्यता आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आवश्यक त्या उपाययोजना ठेवण्यात येणार आहेत. इतकेच नव्हे तर भाविकांना योग्य सोयी-सूविधा मिळाव्या तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन बंदुकधारीसह २५ महिला व ७५ पुरुष स्वयंसेवक सेवा देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
भाविकांना साई पादुकांच्या दर्शनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:56 PM
साई पादुकांचे आगमन १९७५ व १९७८ नंतर वर्धेत होत असून शुक्रवार २ फेब्रुवारीला स्थानिक मगनवाडी भागातील साई मंदिरात श्रींच्या पादुका आणल्या जाणार आहेत. त्या भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात ेयेईल. त्याचा वर्धा शहरासह परिसरातील साई भक्ततांनी लाभ घ्यावा, ...
ठळक मुद्देविठ्ठल व्यवहारे : २ फेब्रुवारीला साई मंदिरात होणार आगमन