लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक नगर पालिकेच्या वतीने आयोजित प्रस्तावित अर्थसंकल्पाच्या विशेष सभेवर विरोधी बाकावरील कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसचे न.प. सदस्य पवन महाजन, गौतम पोपटकर, सुनील बासू, राजश्री देशमुख, संगीता कामडी, अश्विनी काकडे आदींनी नगराध्यक्ष सुचिता मडावी यांना निवेदन देऊन सभेवर बहिष्कार घालत असल्याचे तसेच या बहिष्काराची नोंद सभेच्या कार्यवृत्तात घेण्याचे सांगितले.विरोधी सदस्यांच्या वॉर्डाची विकासकामे थांबवून भेदभाव करीत असल्याचे कारण यावेळी देण्यात आले.मागील दोन वर्षांपासून नगरपालिकेच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात विकासकामांची मोठ्या प्रमाणात तरतूद केली जात आहे. न.प. च्या सर्वसाधारण सभेत वारंवार विकास कामांचे विषय पटलावर घेऊन सर्वानुमते संमत केले जात आहे. परंतु, या विकासकामांतून विरोधी सदस्यांच्या वॉर्डांना परस्पर डावलून सापत्न वागणूक दिली जात आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत लोकांच्या मागणीची या अर्थसंकल्पात दखल न घेता तोंडाला पाने पुसली जात आहे. याबाबत विचारणा केली असता विषयाला बगल दिली जात आहे. आदी आक्षेप निवेदनात नोंदवून अर्थसंकल्पीय विशेष सभेवर बहिष्कार करीत असल्याचे सांगण्यात आले.
अर्थसंकल्पीय सभेवर विरोधकांचे बहिष्कारास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:00 PM
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने आयोजित प्रस्तावित अर्थसंकल्पाच्या विशेष सभेवर विरोधी बाकावरील कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसचे न.प. सदस्य पवन महाजन, गौतम पोपटकर, सुनील बासू, राजश्री देशमुख, संगीता कामडी, अश्विनी काकडे आदींनी नगराध्यक्ष सुचिता मडावी यांना निवेदन देऊन सभेवर बहिष्कार घालत असल्याचे तसेच या बहिष्काराची नोंद सभेच्या कार्यवृत्तात घेण्याचे सांगितले.
ठळक मुद्देविकासकामात भेदभाव : निवेदनात नोंदविले आक्षेप