शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

युद्धाभिमुख राजकारणाला गांधी जिल्ह्याचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:31 AM

पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देपुलवामा शहिदांना श्रद्धांजली : जागतिक शांतीसाठी प्रार्थना, सामाजिक संघटनांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभा घेण्यात आली. देशाचे राजकारण ज्याप्रकारे सैनिकीकरणाच्या दिशेने जाते आहे ते धोकादायक असून युद्धज्वर पेटवण्याच्या उन्मादी राजकारणाला आम्ही ठाम विरोध करतो, अशी स्पष्ट भूमिका या संघटनांनी घेतली.या सभेत सर्वच प्रकारच्या दहशतवादी कृतीचा तीव्र निषेध करीत असल्याची भावना व्यक्त करतानाच दहशतवादाविरोधात सर्व देश एकत्रित उभा राहण्याची गरज असल्याची भूमिका मांडण्यात आली. पुलवामा भीषण हल्ल्यासाठी जबाबदार घटकांना सूडबुद्धीने नव्हे तर शांतबुद्धीने शिक्षा झालीच पाहिजे, मात्र निष्पापांचे रक्त न सांडता या गंभीर प्रश्नाचे समाधान शोधायला हवे. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहिदांच्या बलिदानाचे राजकारण करत सांप्रदायिक तेढ निर्माण करणे, अन्य राज्यांत राहणाऱ्या काश्मिरी जनतेवर हल्ले करणे, असे प्रकार काही भागात सुरु झाले असून ते दहशतवाद्यांच्या पत्थ्यावर पडणारेच आहे. द्वेषभावनेने व प्रांतवादाने ग्रस्त हल्ले थांबवायला हवेत, मात्र युद्ध हा त्यासाठी पर्याय नसावा, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दहशतवादी प्रवृत्तींना सदबुद्धी यावी, जगभरातील नरसंहार टाळावा आणि देशातील विविध धर्म व प्रांतातील लोकांमध्ये बंधुभाव नांदावा, यासाठी यावेळी सर्वधर्म समभाव प्रार्थना आणि विश्व शांतिपाठाचे सामूहिक स्वरात पठण करण्यात आले.या प्रार्थना सभेत आंबेडकरी चळवळीतील विचारवंत प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे, मगन संग्रहालय समितीच्या डॉ. विभा गुप्ता, आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, नई तालीम समितीच्या सुषमा शर्मा, ग्राम सेवा मंडळाच्या ओजस सु. वि. यांनी प्रारंभी भूमिका स्पष्ट केली. प्रशांत नागोसे यांनी यावेळी गीते सादर केली. सभेला करुणा फुटाणे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, अध्ययन भारतीचे हरीश इथापे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, प्रा. किशोर वानखडे, मुरलीधर बेलखोडे, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, सेवा संघाचे रवींद्र कडू, बहार नेचर फाउंडेशनचे राहुल वकारे, फूटपाथ स्कूलचे मोहित सहारे, मालती, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रीती जोशी, सिद्धेश्वर उमरकर, सुधाकर कुमरे, आनंद निकेतनचे पंडित चांनोळे, मनोज ठाकरे, दिनेश प्रसाद, गणेश बोरकर, मंगला नागोसे, प्रफुल्ल नागोसे, ज्योती माकनवार, संदीप माकनवार, सतीश साम्रतवर, विजय डगवार, अंकित बारंगे उपस्थित होते.