शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

९७ हजार बालकांना देणार ‘ओआरएस’ व ‘झिंक टॅब्लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:57 AM

आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे.

ठळक मुद्देघरोघरी व अंगणवाडीत वितरण : विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १३ आॅगस्ट दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयाच्या ९७ हजार ३२५ बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र तथा घरोघरी जाऊन ओआरएस व झिंक टॅबलेटचे वितरण करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व परिचारिकांद्वारे मंगळवारपासून या अभियानास जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८१ उपकेंद्र असून ९१५ गावांत १ हजार ४ आशा स्वयंसेविका ९७ हजार ३२५ बालकांना घरोघरी जाऊन तथा आरोग्य केंद्र, उपकंद्रांतून ओआरएस व झिंक टॅबलेट देणार आहे. यातील शहरी भागाची लोकसंख्या २ लाख ९३ हजार ३८० असून शून्य ते पाच वर्षे वयाची बालके असलेल्या कुटुंबांची संख्या १९ हजार ५६२ आहे. या कुटुंबांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयाची २५ हजार ८३५ बालके आहेत. या शहरी क्षेत्रात येणाºया बालकांना १३७ अंगणवाडी सेविका व २७ परिचारिकांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये ओआरएसचे पॅकेट व झिंक टॅबलेट देण्यात येणार असल्याची माहिती सामान्य रुग्णालय व जि.प. आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या मोहिमेत अतिसाराची लागण झालेल्या बालकांवर उपचार केले जाणार आहेत. यात क्षार संजीवनी म्हणजेच ओआरएस व १४ दिवसपर्यंत झिंकच्या गोळ्या देण्यात येणार आहे. २ ते ६ महिन्यांपर्यंतच्या बालकांना झिंकची अर्धी गोळी मातेच्या दुधामध्ये विरघळून द्यायची आहे. ६ महिन्यांच्या वरील बालकांना या झिंकच्या गोळ्या ओरआरएसच्या द्रावणातून देता येतात. शिवाय बालके खाऊ शकत असल्यास ही गोळी चघळूनही खाता येत असल्याचे आरोगय विभागाद्वारे सांगण्यात आले.अतिसाराने दगावतात दहा टक्के बालकेचिमुकल्यांना अतिसाराची लागण झाल्यास ती त्यांच्या जीवावर बेतणारी ठरते. लोकसंख्येच्या दहा टक्के शून्य ते पाच वर्षे वयाची बालके आढळतात. यातील दहा टक्के बालकांना अतिसाराची हमखास लागण होत असल्याचे आतापर्यंतच्या नोंदींतून आढळून येते. एकूण बालकांच्या दहा टक्के बालके ही अतिसाराने दगावत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे या वयोगटातील बालकांना अतिसाराची लागण झाल्यास त्वरित उपचार करणेच गरजेचे असते.समज, गैरसमजही अधिकनागरिकांमध्ये बालकांना होणाºया आजारांबाबत अनेक समज, गैरसमज आढळून येतात. हे गैरसमज दूर करणे गरजेचे झाले आहे. बाळांना दात निघत असताना हगवण लागते, हसा समज आहे. हा गैरसमज आहे. वास्तविक, दात निघत असताना चिमुकल्यांना काहीतरी खावेसे वाटते. यामुळे ते काहीही तोंडात घालतात. यातून इन्फेक्शन होत असल्याने आजाराची लागण होते. यावर घरगुती कुठलेही इलाज न करता ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वा खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते.आरोग्य केंद्रात अभियानाचा शुभारंभआंजी (मोठी) - आरोग्य विभागाकडून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविला जात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या पंधरवड्याचे उद्घाटन मंगळवारी जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बहादुरे, डॉ. मोडक उपस्थित होते.यावेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्या कशा पद्धतीने द्यायच्या, याचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. सभापती गफाट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ओआरएसचे द्रावण पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जी.पी. पवार, पी.टी. काळे, प्रणाली चौधरी, शंभरकर, लोखंडे, आरोग्य कर्मचारी तथा आशा गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पालकांनी पाच वर्षेपर्यंतच्या बालकांचे अतिसारापासून रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.अतिसारावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे. यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना ओआरएसचे पॅकेट आणि झिंक टॅबलेट देण्यात येत आहे. ही मोहीम सध्या अंगणवाडी केद्रांतून राबविली जात आहे.- डॉ. एन.बी. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.क्षार संजीवनी म्हणजेच ओआरएस हे अतिसारावरील गुणकारक औषध आहे. मागील १०-२० वर्षांत झालेल्या संशोधनापैकी ओआरएस हे एक महत्त्वाचे संशोधन मानले गेले आहे. ओआरएसमुळे असंख्य बालकांचे आजपर्यंत प्राण वाचविता आले आहे. यामुळे ५ वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या पालकांनी या अभियानाचा लाभ घेतला पाहिजे.- डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा.