शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

1,387 पैकी 1,338 गावांची पैसेवारी 51 पैशांहून अधिकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 5:00 AM

वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १ हजार ३८७ गावे खरीप पिकाखाली असून यंदाच्या वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उसंत घेत सुरू राहिलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी आली. इतकेच नव्हे तर प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणांमुळे आणि लागवड योग्य नसल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड झाली नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून यात तब्बल १ हजार ३३८ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५१ पैशांहून अधिक असल्याचे नमूद केले आहे.वर्धा तालुक्यातील केवळ एका गावाची पैसेवारी ५१ ते ६० मध्ये असून १५३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. सेलू तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये असून देवळी तालुक्यातील ३६ गावांची ५१ ते ६० व ९३ गावांशी ६१ ते ७० तर २० गावांची पैसेवारी ७१ ते ९० पैशामध्ये आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८७ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. समुद्रपूर तालुक्यातील २२ गावांची ६१ ते ७० व १२१ गावांची ७१ ते ८० तर ७६ गावांशी पैसेवारी ८१ ते ९० पैशामध्ये आहे.   आर्वी तालुक्यातील ३४ गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर १७३ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये आहे. आष्टी तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशांत असून कारंजा तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ५१ ते ६० तर २० गावांची पैसेवारी ६१ ते ७० पैशामध्ये  असल्याचे  सांगण्यात   आले. 

६१ ते ७० पैशात तब्बल ९५० गावांची पैसेवारी

-  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून ५१ ते ६० मध्ये १७१, ६१ ते ७० मध्ये ९५०, ७१ ते ८० मध्ये १४१ तर ८१ ते ९० मध्ये ७६ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यातीची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्यांना शासनाकडून विविध योजनांचा विशेष लाभ दिला जातो.

हवालदिल शेतकऱ्यांच्या पदरी निराशा-   यंदाच्या वर्षी अनेक सोयाबीन उत्पादकांना समाधानकारक उत्पन्न झाले असले तरी जिल्ह्यातील काही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी नापिकीच आली आहे. तर यंदा दोन वेचणीनंतर कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी पिकांसाठी तयार होतेय शेत जमीनसेलू तालुक्यातील अनेक शेतकरी कपाशी उपटून रब्बी चणा किंवा गहू पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहे. तर काही हवालदिल शेतकरी खरीप हंगामातील नुकसान भरून काढता यावे या हेतूने रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करीत आहेत. 

विशेष अनुदानापासून राहावे लागेल वंचित-    ज्या जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या आत असते त्या जिल्ह्याला तसेच त्या तालुक्याला शासनाकडून विशेष अनुदान जाहीर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. पण यंदा वर्धा जिल्ह्यातील १ हजार ३३८ गावांची पैसेवारी ५० पैशाहून अधिक असल्याने शासनाच्या विशेष अनुदानापासून वर्धा जिल्ह्याला वंचितच राहावे लागणार आहे.