लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या घटत असून ही बाब चिंतेची असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढे यावे, असे आवाहन वन विभागाकडून केले जाते. परंतु, आज तळणी शिवारात पाच रोह्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने वन विभागाचे दुर्लक्षित धोरण चव्हाट्यावरच आल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यातील तळणी भागवत शिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याचे शेतकºयांच्या लक्षात येताच त्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, परडखे, शेख यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तातडीने विहिरीत पडलेल्या रोह्यांना विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माहिती मिळताच झटपट वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठणे गरजेचे असताना ते उशीराने पोहोल्याची चर्चा परिसरात होत होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी सायंकाळी उशीरापर्यंत एकूण तीन रोह्यांना सुखरूप विहिरीबाहेर काढले. तर पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे. वृत्तलिहिस्तोवर सदर विहिरीत आणखी काही रोही तर नाही ना, याची शहानिशा वनविभागाच्या अधिकाºयांकडून केली जात होती.तळणी भागवत शेत शिवारातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये तीन रोह्यांना सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात यश आले असून पाच रोह्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहे.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, वर्धा.
आठपैकी तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:32 PM
देवळी तालुक्यातील तळणी (भागवत) शेतशिवारातील एका शेतातील विहिरीत काही रोही पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, नेहमीप्रमाणे वनविभागाच्या अधिकाºयांनी उशीराने पोहोचून रेस्क्यू आॅपरेशन राबविले. त्यांच्या प्रयत्नामुळे तीन रोह्यांना विहिरीबाहेर सुखरूप काढण्यात यश आले असले तरी पाच रोह्यांना विहिरीत जलसमाधी मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत विहिरीतील रोह्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
ठळक मुद्देतळणी (भागवत ) येथील घटना : वन विभागाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर