लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात काही दिवसांपासून आरोग्यासाटी अपायकारक असलेल्या सध्याच्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या बेशुमार वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आपल्याला कोरोना तर नाही ना, अशी धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.शहरासह जिल्ह्यातील गावागावांतील घरांमध्ये थंडी, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला आदी लक्षणे वाढल्याचे चित्र आहे. घरातील एका पाठोपाठ एक व्हायरल आजाराने त्रस्त असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात गेलो तर कोरोना तपासणी करावी लागेल या चक्रव्युहात सध्या नागरिक अडकलेले दिसून येत आहेत. पावसाळ्यामुळे वातावणाच्या बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दूषित पाण्याचा पुरवठा, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. ढगाळ वातावरण कधी पाऊस, पावसामुळे थंडीचे वातावरण यामुळे जीवाणू व विषाणू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.लॉकडाऊनमध्ये शिथीलता येताच कोरोना परत गेला या भ्रमात राहून अनेक जण बेफिकिर राहून रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यापासून कोरोना रुग्ण वाढीचा दरही वाढला आहे. पूर्वी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला तर त्याची सर्वत्र चर्चा व्हायची. मात्र, आता दररोज शेकडो कोरोनाचे रुग्ण निघत असतानाही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. मास्क वापरणे बंद झाले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंद झाले आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचे रुग्ण ठिकाणी मोठ्या संख्येने निघत आहेत. कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आवश्यक आहे. गरम पाण्याचा वापर करणे, वाफ घेणे, मिठाच्या गुळण्या आधी प्राथमिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून दिल्या जात असून नागरिकांमध्ये कमालीची धास्ती भरली आहे.तसर्दी, खोकल्याने काढले डोकेवरवातावरणात अचानक बदल झाल्याने कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये व्हायरल इन्फेक्शन वाढत चालले आहे. घरोघरी नागरिकांमध्ये सर्दी, खोकल्याचे लक्षण दिसून येत आहेत. आपल्याला कोरोना तर नाही ना, असा प्रश्नही नागरिकांना त्रासून सोडत आहे.
सामान्य रुग्णालय हाऊसफुल्लजिल्हा सामान्य रुग्णालयात व्हायरल इनफेक्शन झालेल्या रुग्णांची मोठी गर्दी वाढली आहे. दररोज चारशे ते पाचशे नागरिकांची ओपीडी असून विविध जलजन्य आजारांनी नागरिकांना ग्रासले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आजारांमध्ये वाढ झाली आहे.कोरोनाची धास्तीसध्या घराघरांत व्हायरल इनफेक्शनने डोकेवर काढले आहे. तोंडाची चव जाणे, खोकला, ताप, सर्दी होणे हे व्हायरलचे लक्षणे असून कोरोनाचेही असेच लक्षणं असल्याने आपल्याला कोरोना तर झाला नसेल ना, अशी भीती नागरिकांमध्ये असून कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे.