शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

मालक आपण लई कष्ट करू पण....

By admin | Published: September 14, 2015 2:09 AM

राज्यासह जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पोळ्याच्याच पर्वावर वडनेर येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

पराग मगर वर्धाराज्यासह जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पोळ्याच्याच पर्वावर वडनेर येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. पोळ्याच्या चंगळवादी उत्साहात याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष झाले असले तरी ‘मालक आपण लई कष्ट करू, पण तुम्ही आत्महत्या करायची न्हाय’ या सोशल मीडियावरील चित्रमय संदेशाने अनेकजण गहिवरले. पोळ्याच्या पूर्वसंध्येलाही अवघ्या राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच होते. जिल्ह्यात वडनेर येथील विठोबा वावधने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. एकीकडे मोठमोठ्या मंडळांद्वारे बैलपोळा तसेच तान्हापोळा उत्साहात साजरा झाला. बक्षीसांची लयलूट झाली. बैलांच्या उपकारातून उतराई होण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी उसनवारी घेत पोळा साजरा केला. बैलांना सजविले. हा दिवस त्याच्याकरिता महत्त्वाचा; पण पावसाच्या दडीने सोयाबीनवर आलेला रोग व पावसाच्या प्रतीक्षेतील कपाशी उत्पन्न देईल अथवा नाही हा विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत आहे. यामुळे अनेकांच्या मनात आजही जीवनयात्रा संपविण्याचे विचार डोकावत असतीलही. सतत चर्चेत राहत असलेल्या ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयाला सोशल मीडियावर नवीन धुमारे फुटत आहेत. माणसांना पोळ्याच्या शुभेच्छा देत आपणही बैल असल्याचे भासवत हास्यविनोदही निर्माण केले जात आहे. परंतु अशातच पाठमोऱ्या एका शेतकऱ्याच्या दोन्ही खांद्यावर मान ठेवून ‘मालक आपण लई कष्ट करू, पण तुम्ही आत्महत्या करायची न्हाय’ या संदेशाचे व्हायरल झालेले चित्र अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहे. या चित्रातही शेतकरी हतबल दिसतो. त्यामुळे तो आजच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्वच करीत आहे. शासनानेही या चित्राकडे बघावे आणि शेतकरीच नाही तर त्या बैलांचीही मनोव्यथा समजून घावी, अशी आशा व्यक्त होत आहे. उत्सव नेमका कुणासाठी?शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र बैलपोळा जल्लोषात साजरा झाला. वर्षभर मानेवर जू शिवाय काहीही नसलेल्या बैलांना सजविण्यात आले होते. शेतात शांतपणे आपले काम करीत असलेल्या बैलांच्या कानापाशी मोठमोठ्याने ढोल वाजविले जात होते. कुणी कुणी तर फटाकेही फोडत होते. यामुळे घाबरलेले बैल सैरावैरा पळत होते, बिथरत होते. शेतकऱ्यांना त्यांना आवरणे कठीण झाले होते. त्यामुळे पोळ्याच्या दिवशीही अनेक बैलांना दोराचे फटके खावे लागले. या प्रकारामुळे हा सण नेमका कुणासाठी हा प्रश्न उपस्थित होत होता.