शेडगाव शिवारातील घटना : बसची बैलबंडीला धडक
वर्धा : भरधाव बसने बैलगाडीला दिलेल्या धडकेत एक बैल ठार झाला तर बैलगाडीवरील पती-पत्नी जखमी झाले़ हा अपघात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव शिवारात झाला़ अंबादास इतवारे व बेबी इतवारे दोघेही रा़ समुद्रपूर अशी जखमींची नावे आहेत़ पोलीस सुत्रांनुसार, अंबादास इतवारे हे शेतातील काम आटोपून बैलगाडीने समुद्रपूरकडे जात होते़ दरम्यान एपी २९ झेड ३३०१ क्रमांकाच्या बसने बैलगाडीला धडक दिली़ या धडकेत एक बैल जागीच ठार झाला तर शेतकरी व त्याची पत्नी जखमी झाले़ जखमींना तातडीने समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ समुद्रपूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जंजाळ यांनी घटनेची नोंद केली.
याप्रकरणी बस चालकावर भांदविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला़ यात बैलगाडीचे अतोनात नुकसान झाले़ बस चालकाला ताब्यात घेतले. (स्थानिक प्रतिनिधी) केळझर परिसरात दुचाकी कारवर आदळली; एक गंभीर ४केळझर - धुंदीत असलेल्या तरुणाने दुचाकी भरधाव चालवून कारला मागाहून धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक जबर जखमी झाला. तर मागे बसलेला त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला. सदर अपघात केळझर नजीकच्या वर्धा-नागपूर महामार्गावरील सामाजिक वनीकरणजवळ मंगळवारी दुपारी १.२० वाजताच्या सुमारास घडला. ४कार क्र. एमएच- ३१ सी आर १६१३ ही नागपूरवरून वर्धेकडे येत होती. त्याच दिशेने येणारी दुचाकी कारवर धडकली. या अपघातात दुचाकीचालक करण बंदरे (२५) रा.म्हसाळा हा जबर जखमी झाला. तो मद्यप्राशन करून असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. त्याच्यावर खडकी येथील संकट मोचन धर्मार्थ दवाखान्यात प्रथमोपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. यात कारचेही नुकसान झाले. वृत्त लिहेपर्यंत सेलू पोलीस घटनास्थळावर पोहचले नव्हते.