लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील प्रकल्पच यंदा आॅक्सिजनवर असून समाधानकारक पाऊस न झाल्यास वर्धा जिल्ह्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.पावसाने दगा दिल्याने यंदाच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांचेही बजट विस्कळले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आलेल्याने तसेच सिंचनासाठी पाणीच मिळणार नसल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनीही विविध उन्हाळी पीक घेण्याचे टाळले आहे. ज्यांच्या शेतात विहीर व विहिरीत बऱ्यापैकी पाणी आहे अशाच शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पीक घेण्याचा धाडस केला.तर घराच्या आवारात असलेल्या विहिरींनीही तळ गाठल्याने शिवाय कमी खोलीच्या कुपनलीकाही कोरड्या झाल्याने नागरिकांनीही मोठा आर्थिक खर्च सोसून नवीन बोअरबेल केल्या आहेत. तर ज्यांची बोअरवेल करण्याची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांना सध्या शेजारच्याकडून उसणवारीवर पाणी घेऊन गरज भागविली जात आहे.पंचधारा, मदन, मदन उन्नई धरण व सुकळी लघु प्रकल्प हे मध्यम प्रकल्प तर परसोडी व टाकळी बोरखेडी हे लघु प्रकल्प सध्या कोरडे झाले आहेत. तर उर्वरित १८ लघु प्रकल्पात १ दलघमीपेक्षाही कमी उपयुक्त जलसाठा सध्या आहे. येत्या काळात वाढत्या उन्हामुळे तो झपाट्याने घटण्याची शक्यता आहे. वर्धा शहर आणि परिसरातील १३ गावांमधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी फायद्याचा ठरणाºया धाम प्रकल्पात सध्या ६.२७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे जोरदार पाऊस येईपर्यंत तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे. शिवाय तसे आवाहनही सर्व स्तरातून केले जात आहे.अधिकाऱ्यांनी केली ‘धाम’ची पाहणीयंदा महाकाळी येथील धाम प्रकल्पाची पाणी पातळी सर्वाधिक खालविल्याने व धामच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होत भविष्यातील जलसंकटावर मात करता यावी या उद्देशाने यंदा धाम गाळमुक्त करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठकही बोलावली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी वर्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मासोद, महाकाळी हे गाव गाठून धाम प्रकल्पातून सुमारे किती गाळ काढता येईल याबाबत पाहणी केली.
जिल्ह्यातील जलाशय आॅक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:02 PM
जिल्ह्यातील चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प कोरडे झाले असून अन्य मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पातळी अतिशय खालावल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देपाणी साठ्यात होतेय घट : चार मध्यम अन् दोन लघु प्रकल्प झालेय कोरडे