रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुलं सकाळी तयारी करून घरून कॉलेजकरिता निघतो, असे सांगून जातात. खरच यातील काही मुले कॉलेजात जातात की आपल्या पालकांच्या विश्वासाला दगा देत आपले भविष्य धोक्यात घालत आहेत, हे तपासण्याची वेळ आली आहे. पालक सकाळपासूनच आपल्या कामात व्यस्त असतात, यात दुमत नाही. या व्यस्ततेत आपल्या लाडका-लाडकीकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, याचा विचारही पालकांनी करायला हवा. अन्यथा हातची वेळ गेल्यानंतर ओरडून काहीच होणार नाही. सामाजिक विकासाकरिता युवकांना मोकळीक गरजेची आहे, पण त्या ‘फ्रीडमचा’ वापर या युवकांकडून कोणत्या प्रकारातून होतो, याकडे पालकांनी लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे. शिवाय मुलांनीही पालकांच्या विश्वासाचा घात होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.मुलगा असो वा मुलगी कॉलेजात जाताच त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याकडे पालकांचा कल असतो. या सुविधा पुरविताना आपल्या पाल्याचा सार्वत्रिक विकासाकडे लक्ष देण्याची त्यांची जबाबदारी आहे, याचा त्यांना विसर पडल्याचे आज सर्वत्र दिसू लागले आहे. काही घटना घडल्यास कुणाला दोष देण्यापूर्वीच आपला पाल्य भरकटत तर नाही ना, याचा विचार करून पालकांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून मुलावर नजर ठेवल्यास समाजात एक उत्तम नागरिक तयार करण्याची त्यांची जबाबदारी पार पडेल.आज फॅशनच्या नावावर काही मुलांना अनेक व्यसने जडली आहेत. ती व्यसने त्यांच्याकरिता जीवघेणी ठरत आहे. याची त्यांना कल्पना नसावी. या बाबत हटकले असता हा प्रकार आम्ही तारुण्यात नाही करणार तर मग काय म्हातरपणात करणार, अशी उद्धट उत्तरं या युवकांकडून अनेक ज्येष्ठांना मिळाली आहेत. यातूनच हे जीवघेणे व्यसन त्यांच्याकरिता धोक्याचे ठरते याचा विचार त्यांच्या डोक्यात नसल्याचे चित्र आहे.शहरात सकाळच्या वेळी निर्जन रस्त्यावर महाविद्यालयीन मुले एक ग्रूप करून बसून असतात. येथे त्यांच्या गोष्टी आणि तोंडातून निघणारा सिगारेटचा धूर सर्वांना विचारात टाकणारा आहे. हा प्रकार येथील हनुमान टेकडीवर जरा वाढत असल्याचे दिसून आले आहे. येथे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी दुचाकीने येणारे युवक व त्यांच्याकडून होणारे प्रकार पालकांना विचारात टाकणारे आहेत. यातूनच मग या युवकांत वाद उफाळून त्यांच्या भांडणे झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. यातून सध्या मोठी घटना घडली नसली तरी तिची शक्यता नाकारता येत नाही. असाच प्रकार युवतींबाबत घडत आहे. चेहºयावर स्कार्फ गुंडाळून शहराच्या बाहेर जात असल्याचे प्रकार वाढत आहे. यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पालकांनी वेळीच सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.चेहºयाला स्कार्फ बांधून वाहने सुसाटसकाळी कॉलेज किंवा शिकवणी वर्गाच्या नावावर घरातून बाहेर पडलेल्या युवती आपल्या दुचाकी कुठे एका ठिकाणी ठेवून आपल्या मित्रासह दुचाकीने शहराच्या बाहेर जात असल्याचे दिसून आले आहे. शहराबाहेर निर्जनस्थळी जात या युवकांकडून दिवसभर हुंदडले जात असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. दुचाकीने जात असलेले युवक-युवती आपला चेहरा ज्या प्रकारातून बांधतात त्यातून ते कोण हे ओळखणेही अवघड जाते. काही वेळा तर पालकांसमोरून त्यांची मुलगी आपल्या कथित प्रियकराच्या दुचाकीवर बसून सुसाट पळल्याच्या घटना घडल्या आहेत.नदी, धरणांसह शेतात गर्दीवर्धा शहरात अनेक महाविद्यालये आहेत. यातील युवक युवतींनी त्यांचा मोर्चा शहराच्या बाहेर जात लगतच्या पवनार येथील धाम नदी, रोठा तलाव, महाकाळी धरण, मदन उन्नई प्रकल्प, बोरधरण या ठिकाणांकडे वळविला आहे. या नदी धरणांसह युवकांकडून निर्मनुष्य शेतांतही ठिय्या असल्याचे जामणी, सेवाग्राम-पवनार मार्गावर दिसून आले. येथील शेतकºयांनी अशा जोडप्यांना शिवीगाळ करीत हाकलून लावल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असले तरी या प्रकाराला आळा बसत नसल्याचे चित्र आहे.