शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:30 IST

समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

ठळक मुद्देरामदास तडस : गुणवंतांचा गुणगौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर जे यश प्राप्त केले आहे. ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगली कामे होऊन त्यांच्या कार्याचा झेंडा सर्वत्र फडकावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, तेलरांधे, योगेश कुंभलकर, प्रतिभा बुरले, वंदना भुते, शुभांगी कोलते, शरद सहारे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या एकूण ११० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच याप्रसंगी सेलू नगरपंचायत समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शारदा माहुरे, पी.एच.डी. प्राप्त डोंगरे, छायाचित्रकार कवी भट यांचाही सत्कार करण्यात आला. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. योग्य शिक्षण आपल्या जीवनात महत्त्वाचे असून त्याची निवडही वेळीच विद्यार्थ्यांनी करावी. नविन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो, असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारावी असे आवाहन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रशांत सव्वालाखे, अतुल वांदीले, शेखर शेंडे, शोभा तडस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बुरले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रिया शेंदरे यांनी केले तर आभार सुनील शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाने, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे, शेखर लाजुरकर, सुप्रिया शिंदे, माया चाफले, माया उमाटे, मोना किमतकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसStudentविद्यार्थी