शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

प्रवासी दोन तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:15 PM

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या.

ठळक मुद्देआर्वी आगारातील प्रकार : अधिकाऱ्यांकडून सौजन्याची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या. परंतु, याच दरम्यान पुलगावच्या दिशेने जाणारी एकही गाडी न सोडल्याने तपत्या उन्हात अनेक प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. चौकशी कक्षात विचारणा केल्यावर गाडी आल्यावर त्या दिशेने गाडी पाठविण्यात येईल, असे उत्तर देऊन वेळकाढू धोरणच अवलंबल्या गेले.आर्वी बस स्थानकावरून आर्वी आगाराच्या बसेस पुलगाव व इतर गावांसाठी सोडल्या जातात. परंतु, या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी धड बसण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असली तरी प्रवाशी ज्या ठिकाणी बसची प्रतीक्षा करतात तेथील पंखेच नादुरूस्त आहेत. उल्लेखनिय म्हणजे व्यवस्थापकच त्यांच्या कक्षात राहत नसल्याने प्रवाशांनी तक्रार करावी कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आर्वी-पुलगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होते. तब्बल दोन-दोन तास या मार्गावर बसेस सोडल्या जात नसल्याने रापमच्या अधिकाऱ्यांचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसोबत सोटेलोटे तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येथील मनमर्जी कारभाराकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष होत आहे.अन् संतप्त प्रवाशांनी मोडली अधिकाºयांच्या नावाने बोटेलग्न सभारंभाला उपस्थिती दर्शविल्यानंतर परतीचा प्रवास करणारे प्रवासी दुपारी १ वाजता आर्वी बस स्थानक येथे पोहोचले. या प्रवाशांमध्ये खुबगाव, पिपरी, पारगोठाण, धनोडी, सावंगी, रोहणा सुमारे २०० नागरिक होते. तर रोहणा येथील स्व. कोल्हटकर कला महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जाणारे काही विद्यार्थीही होते. दीड तासाचा भºयाचा कालावधी लोटला तरी पुलगावच्या दिशेने बस न लागल्याने संतप्त प्रवाशांनी चौकशी कक्ष गाठले. परंतु, तेथेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवाशांनी आपला मोर्चा आगार व्यवस्थापकांच्या दालनाकडे वळविला. पण तेथे अधिकारीच नसल्याने प्रवाशांचा पारा आणखी चढला. त्यांंनी अधिकाºयांच्या नावाने बोटच मोडली. त्यानंतर काही काळीपिवळी गाडीने पुलगावच्या दिशेने निघाले. तर उर्वरित प्रवाशांनी रापमच्या अधिकाºयांनी ३.१५ वाजता लावलेल्या आर्वी-पुलगाव-यवतमाळ या रापमच्या गाडीने घर जवळ केले.

टॅग्स :state transportएसटी