शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक

By admin | Published: June 23, 2014 12:15 AM

जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीवर असणारे डॉक्टर मोठ्या वेतनावर असताना खासगी दवाखाने सुरू करतात़ यामुळे ज्या रुग्णालयात नोकरी करतात तेथे कर्तव्यात कसूर करून तेथील रुग्णांना स्वत:च्या

वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीवर असणारे डॉक्टर मोठ्या वेतनावर असताना खासगी दवाखाने सुरू करतात़ यामुळे ज्या रुग्णालयात नोकरी करतात तेथे कर्तव्यात कसूर करून तेथील रुग्णांना स्वत:च्या खासगी दवाखान्यात येण्यास बाध्य करतात़ हा प्रकार जिल्ह्यासह वर्धेत सर्रास सुरू आहे़ जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देत अशा डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़शासकीय नोकरीवर असल्याने खासगी दवाखाना थाटण्यास मनाई करणे गरजेचे आहे़ नोकरी किंवा खासगी क्लिनिक, असा नियम करणे आवश्यक आहे; पण दोन्ही ठिकाणी सेवा दिली जात असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे़ आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास रुग्णांना सहन करावा लागतो़ शिवाय त्यांची पिळवणूक होत आहे़ खासगी दवाखाने सुरू केल्याने ज्या ठिकाणी डॉक्टर नोकरी करतात, तेथे योग्य सेवा देत नाहीत़ पळ काढण्याच्या तयारीत असतात व स्वत:च्या दवाखान्यातील रुग्णसंख्या कशी वाढेल, याचाच विचार ते करतात. नोकरी करून केवळ वेतन घेतात; पण रुग्णांना योग्य सेवा देत नाहीत़ यामुळे शासनाने जे डॉक्टर नोकरी करतात, त्यांना खासगी दवाखाने लावता येणार नाही, असा नियम करणेच गरजेचे आहे़ आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडूनच सध्या रुग्णांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे़सामान्य रुग्णालयातून आऊट प्रिस्कीप्शनमधून रुग्णांना पूर्णत: औषध मिळत नाही. यामुळे सामान्य रुग्णांना बाहेरूनच औषधी खरेदी करावी लागते़ खासगी डॉक्टर रुग्णांची लूट करीत आहेत़ अवाढव्य शुल्क आकारले जात असून रुग्णांना महागडे औषध लिहून दिले जाते़ रुग्णसेवा लक्षात घेता ३० रुपयांच्यावर कोणत्याही डॉक्टरने रुग्णांकडून शुल्क आकारू नये़ डॉक्टर एबीबीएस असो वा एमएस, एमडी असो, रुग्णसेवा करण्याचा दृष्टीकोन ठेवूनच खासगी दवाखाने सुरू करून रुग्णांकडून अल्प शुल्क घेतले पाहिजे; पण असे होत नाही़ गत काही वर्षांत खासगी डॉक्टरच्या शुल्कात अवाढव्य वाढ झाली आहे़ महागडी औषधी रुग्णांचे कंबरडे मोडत आहे़ काही कारण नसताना डॉक्टर रुग्णांना विविध तपासण्या करण्यास बाध्य करतात़ यातही डॉक्टरांचे कमिशन असते. यावरून डॉक्टर रुग्णसेवा करतात की, लूट असा प्रश्न उपस्थित होत आहे़ प्रत्येक डॉक्टरने आपल्या दवाखान्याची वेळ निश्चित करणे गरजेचे आहे़ शिवाय दर्शनी भागात शुल्काचा फलक लावणे व स्वस्त औषधी लिहुन देणे गरजेचे झाले आहे़ खासगी डॉक्टरांनी रुग्णांकडून २० ते ३० रुपये शुल्क आकारावे, स्वस्त औषधी लिहून द्यावी, डॉक्टरांनी दवाखान्यात बसण्याची वेळ निश्चित करावी, अवास्तव तपासण्या करण्यास बाध्य करू नये, स्वत:चे कमिशन बंद करावे, केवळ सेवा हेच ध्येय डॉक्टरांनी ठेवावे, अशी विनंतीवजा मागणीही सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़ डॉक्टर हे सर्वसामान्य लोकांना आरोग्य प्रदान करून निरोगी करणारे असणे अपेक्षित असते; पण त्वरित श्रीमंत होण्याकरिता अवैध मार्ग पत्करुन कशाचीही पर्वा न करता केवळ पैशाच्या मागे लागणारे अनेक डॉक्टर समाजात दिसतात़ यातून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचे दिसते़ हा प्रकार थांबविणे गरजेचे झाले आहे़ रुग्णांना वाचविण्यापेक्षा कसे लुटता येईल, याचा प्रयत्न करणारे डॉक्टर शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करणेही गरजेचे झाले आहे़ मेडिकल कौन्सिलने व शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)