लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कानगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची सकाळपासून गर्दी होत असूनही डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना ताटकाळत रहावे लागते. आजही हाच प्रकार घडल्याने संतप्त रुग्णांनी जिल्हा परिषदचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वात मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सध्या सर्वत्र डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराचे थैमान आहे. तसेच विविध आजारानेही डोके वर काढल्याने रुग्णालयातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कानगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही परिसरातील रुग्णांची गर्दी दिसून येते. येथे सकाळपासूनच रुग्ण गर्दी करतात. परंतु, डॉक्टर, परिचर आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित होत नसल्याने रुग्णांना त्यांच्या प्रतीक्षेत बसावे लागते. ही बाब नित्याची झाल्याने रुग्णांना या वागणूकीचा वैताग आला आहे. सोमवारी याच अडचणीला सामोरे जावे लागल्याने रुग्णांमध्ये असंतोष निर्माण झाला. शेवटी काहींनी माजी जि.प.सभापती मिलिंद भेंडे यांना माहिती दिली. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही याबाबत कळविले. त्यानंतर त्यांनी जि.प. कार्यालय गाठून भेंडे यांच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांना निवेदन देत संबंंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनावर अमरदीप भस्मे, गोपाल कुबडे, देवराव गावंडे, अजश वालदे, चंद्रशेखर मंगेकर, शोभा इंगळे, विनोद वाघमारे, सचिन मस्कर, राजू ठवळे, त्र्यंबक तुरणकर, प्रमोद सिंगोटे, नरेश तायवाडे, शुभम वाघमारे, मधुसुदन गिरी, सलीम शेख, प्रमोद जवादे, शीतल वालदे, प्रभाकर चौधरी, कोमल मानकर, रेखा मेसरे, गोविंद वाघ, राणी मेसरे, प्रवीण गुजरकर, वाढई आदींच्या स्वाक्षºया आहेत.
रुग्ण हजर; कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:06 PM
कानगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची सकाळपासून गर्दी होत असूनही डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना ताटकाळत रहावे लागते. आजही हाच प्रकार घडल्याने संतप्त रुग्णांनी जिल्हा परिषदचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वात मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठळक मुद्देकानगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर