लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खा. शरद पवार हे विदर्भ दौºयानिमित्त वर्धा येथे आले होते. याप्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेती आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक जाण म्हणून विशेष लक्ष देण्याची मागणी स्थानिक विश्रामगृह येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.शरद पवार यांची राजकीय प्रवास व सामाजिक अभ्यास तसेच कृषी क्षेत्रात प्रचंड जाण असणारा नेता म्हणून ख्याती आहे. विदर्भातील शेतकरी व त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणारे प्रामाणिक नेतृत्व विदर्भात निर्माण होऊ न शकल्याने जल, जंगल, जमीन, जनावरे, खनिज, वीज अशा अनेकविध संसाधनांनी परिपूर्ण असलेला विदर्भ शेतकरी आत्महत्या व समस्याग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील जनसामान्य आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाज हा कंगाल झाला आहे. सिंचनाच्या पूरेशा सोयी नसतानाही शेतकरी कष्ट करून पिके घेतो; पण योग्य भाव मिळत नाही. शेतमाल साठवून ठेवण्याची पूरेशी सोय नाही. ऊस व कांदा शेतमाल उत्पादकांकरिता जशी आंदोलने होतात, त्या पद्धतीने विदर्भातील कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, धान या पिकांकरिता भाव मिळावा म्हणून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. सिंचनाच्या पूरेशा सोयींचा अभाव, अपूरा वीज पुरवठा, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव, बाजारपेठेचा अभाव यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे. शेतकरी तसेच महिलांकरिता सक्षम बचत गट निर्माण करणे, महिलांवर होणारे अत्याचार, प्रशासनाची दिरंगाई, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ यामुळे विदर्भातील समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगीता इंगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या वंदना गावंडे, शुभांगी विधळे, वैशाली गिºहे, शारदा डुकरे, मंगला तिगावकर, अश्विनी काकडे, अनीता येवले, अलका भुगूल, किरण बिपल्लीवार, पुष्पा मोहोड, योगीता भुजाडे, संगीता जुमडे, गीता हिवरे, रोहिणी बाबर, निलिमा बोनगिरवार, वर्षा म्हैसकर, प्रतीभा वाळके, सोनाली रोकडे, अश्विनी ठाकरे, कविता नखाते, सुचिता ठाकरे, मेघा सहारे, मीनाक्षी विंचूरकर, सीमा ढोबळे आदी उपस्थित होते.कापसाचे राजकारण थांबविणे गरजेचेविदर्भातील कापसासाठी आंदोलने केली जात नाहीत; उलट आंदोलनांचा देखावा करून राजकारण केले जात आहे. ही बाब आजची नसून कित्येक वर्षांपासून हे होत आहे. परिणामी, कापसाला आजही योग्य हमीभाव मिळत नाही. यामुळे वरिष्ठ नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून विदर्भातील शेतीला न्याय मिळवून देत राजकारण थांबविणे गरजेचे आहे.
शेतकरी, शेती व महिलांच्या समस्यांकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:30 PM
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खा. शरद पवार हे विदर्भ दौºयानिमित्त वर्धा येथे आले होते. याप्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेती आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक जाण म्हणून विशेष लक्ष ....
ठळक मुद्देजिजाऊ ब्रिगेडची मागणी : शरद पवार यांना निवेदनातून साकडे