शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन : सेलूच्या तीन शेतकऱ्यांचा समावेश घोराड : ग्रामपंचायतचे नगर पंचायत होणे हे या तीन शेतकऱ्यांकरिता अडचणीचे ठरले आहे. त्यांना वैयक्तीक सिंचन विहिरीच्या देयकासाठी निवेदन देवून शासकीय पायऱ्या झिजवाव्या लागल्या आहेत. यातही त्यांना देयक मिळाले नसल्याने सेलूल्या तीन शेतकऱ्यांनी पालकमंत्र्याना निवेदन देवून देयक द्या नाही तर आत्महत्येची परवानगी द्या, असे निवेदन सादर केले. या दोन पैकी एकही मागणी मंजूर न केल्यास १५ आॅगस्टला आत्महत्या करण्याचा इशारा या तीन शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनानुसार, शेतकऱ्यांना आपल्या सिंचन विहिरी मंजूर झाल्या. येथूनच त्यांचा लढा सुरू झाला. विहिरीच्या देयकाची अडवणूक होणाऱ्या या तीन शेतकऱ्यात महिला शेतकऱ्याचा समावेश आहे. पंचायत समितीच्या आदेशानुसार या तिनही शेतकऱ्यांनी ७ मार्च २०१५ पासून विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली. अशातच १० मार्च २०१५ पासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू झाला. त्यामुळे मस्टर काढल्या जात नव्हते. विहीर खोदकामाला सुरुवात करून सहा दिवस होते न होते तोच सेलू ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाले. यामुळे या विहिरीचे मस्टर कुणी काढावे, असा प्रश्न पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर एक वर्ष लोटूनही या शेतकऱ्यांना मिळाले नाही.या सिंचन विहिरीचे देयक मिळण्याबाबतचे निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, महसूल मंत्री, पालकमंत्री अशा १७ पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले. पालकमंत्र्यांच्या आदेशाला बगल२१ आॅगस्ट २०१५ च्या वर्धा येथे झालेल्या सभेत नरेगा अंतर्गत अनुदान न देण्यात आलेल्या, परंतु लाभार्थ्यांनी स्वत: केलेल्या विहिरीचे कामे धडक सिंचन योजनेत मंजूर करण्याबाबतचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.
विहिरीचे देयक द्या, नाही तर आत्महत्येची परवानगी द्या
By admin | Published: May 14, 2016 1:59 AM