लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.काँग्रेसच्या उमेदवार महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारुलता टोकस यांच्या निवडणुकीची सूत्रे रामनगरातील जनसंपर्क कार्यालयातूनच हलविण्यात आली. आजही मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनाला सकाळपासून कुलूप होते. तर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कापडी मंडप टाकण्यात आला होता. मतमोजणी असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमात होते. नव्या उमेदीने निवडणुकीच्या निकालाकडे त्यांचे लक्ष लागले होते. परंतु, पहिल्याच फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी ७ हजार ८१६ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतरच्या सर्वच फेरीत भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिल्याने आपसुकच काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता पसरत गेली. त्यामुळे दुपारच्या सुमारास कार्यालयाकडे फेरफटका मारला असता कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.सोबतच जनसंपर्क कार्यालयापुढे टाकलेल्या कापडी मंडपात केवळ वाहनेच दिसून आली. पाच वर्षांत ओसरलेली मोदी लाट त्सुनामीच्या वेगाने आल्याने काँग्रेसचे मताधिक्य सर्वत्र वाहून गेले.यातून गांधी जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारुलता टोकस यांनाही पराभव पत्करावा लागला. पराभवाचा परिणाम जनसंपर्क कार्यालयातील वातावरणातून सकाळपासूनच दिसून येत होता. मतमोजणीच्या फेऱ्यातील मताधिक्याची तफावत लक्षात घेत दुपारपर्यंतच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होताच अनेक कार्यकर्त्यांनी घराचा रस्ता धरला होता.स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयात न येता आपापल्या निवासस्थावरूनच मतमोजणीतील मताधिक्याचा आढावा घेतला.पहिल्या फेरीपासूनच मावळत गेली आशामतदार संघातील मतदानाचा कौल लक्षात घेता कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नव्हता. त्यामुळे काँग्रेसलाही विजयाची आशा होती. पण, पहिली फेरीच काँग्रेसला ७ हजार ८१६ मताने पिछाडीवर घेऊन गेली. त्यांनतरच्या प्रत्येक फेरीत काँग्रेसला कमी मते मिळत गेल्याने स्थानिक नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आशा मावळत गेली. शेवटी मतदारांनी दिलेला कौल मान्य करण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय राहिला नाही.
काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:39 PM
लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.
ठळक मुद्देस्थानिक नेत्यांसह पदाधिकारीही दिसेना : कार्यालयापुढील मंडपात केवळ वाहने