लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतस्तरावरून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी स्वच्छतेचा ग्रामपंचायत प्रशासनालाच विसर पडल्याचे चित्र आहे. बऱ्याच खेडेगावात स्वच्छतेप्रती दुर्लक्ष होत आहे. गावातील वाहणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सांडपाण्याचे डबके साचत असेल तर ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चिकणी येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये विठ्ठल झोड यांच्या घराजवळ सांडपाण्याचे पाट वाहत आहेत. बाबा डफरे, विठ्ठल झोड यांच्या घरासमोरून वाहणाऱ्या नालीचे सांडपाणी विठ्ठल दाभेकर यांच्या घरासमोर व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ साचत आहे. यामुळे आरोग्याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. गजानन बेलसरे, प्रकाश डफरे, गजानन झोड, सचिन राऊत, मालाबाई दाभेकर, किशोर बेलसरे यांनी नाली दुरुस्तीची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
चिकणी गावात अस्वच्छतेने गाठला कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 5:00 AM
गावातील वाहणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सांडपाण्याचे डबके साचत असेल तर ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
ठळक मुद्देग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रोगराईला आमंत्रण