रूपेश खैरी वर्धा कायदा असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. त्यावर आळा बसविण्याकरिता शासनाकडून वाहतूक नियमात काही बदल करून त्यात होणाऱ्या दंडात मोठी वाढ केली आहे. वाढीव दंडाची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो, असे म्हणत असतानाच वाढीव दंडाचा हा नियम सर्वत्र तात्काळ अंमलात आणण्याच्या सूचना धडकल्या. १६ आॅगस्टपासून सर्वत्र नवे नियम लागू झाले आहेत. नव्या नियमांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. वाहनावर असलेल्या क्रमांकातून काही विशेष शब्द तयार करून नियमाचे उल्लंघण करणाऱ्यांवर वाहतूक नियमाच्या कलम २३५ (२) अन्वये कारवाई करून शंभर रुपयांचा दंड देण्यात येत होता. यामुळे अनेकजण या कलमाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. यात एकाच वाहनावर अनेकवेळा कार्यवाही करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. अशा कारवाईवरही त्याच्यावर या वाहन चालकावर कुठलाही परिणाम पडला नसल्याचे दिसून आले. आता दंडाची रक्कम वाढल्यास त्याचा काही परिणाम होईल का, याकडे लक्ष लागले आहे. या व्यतिरिक्त वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्याला पहिले १०० रुपये दंड होता त्यात वाढ होवून तो आता २०० रुपये झाला तर ट्रिपल सिट जाणाऱ्यांना आतापर्यंत १०० रुपये दंड होता तो वाढवून २०० रुपये करण्यात आला आहे. तर रस्त्याने शर्यत लावून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना आता ३०० ऐवजी २००० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. या व्यरिरिक्त वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर दुप्पट दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी दंडाचा दणका
By admin | Published: August 19, 2016 2:07 AM