लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : न्यायिक मागण्यांसाठी गुरूवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक दिली. स्थानिक झाशी राणी चौकातून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचल्यावर तो पोलिसांनी अडविला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लाभ सर्व पेन्शन धारकांना देण्यात यावा. ईपीएफओच्या पेन्शनर विरोधी तसेच कोर्ट निर्णय विरोधी भुमिकेच्या विरोधात देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये पेन्शनरांचे दावे दाखल आहेत. ती सरकारसाठी चांगली गोष्ट नाही. उद्योग आणि सेवा क्षेत्रा मध्ये निवृत्त पेन्शन धारकांनी जे योगदान दिले त्याच्याच भरवशावर आज देश महाशक्ती बनू पाहत आहे. परंतु, अशाच पेन्शन धारकांवर सध्या उपाशी राहण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या मानधनात भरघोस वाढ केली जात आहे. त्यांच्या सारखीच भरघोस वाढ पेन्शन धारकांना देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सर्व ईपीएस पेन्शनधारकांना किमान नऊ हजार रुपये महागाई भत्ता व पेन्शन देण्यात यावी. अंतर्गत वाढीसाठी त्वरित प्रयत्न करण्यात यावे. कमिटी क्र. १४७ अन्वये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा. सर्वोच्च न्यायालयाचा सर्व पेन्शन धारकांना भेदभाव न करता विना अट लागू करण्यात यावा. सर्वांच्या आरोग्यासाठी ईएसआय लागू करून ईएसआय व्यवस्था सक्षम करण्यात यावी. कम्युटेशन रक्कम पुणस्थापित करण्यासाठी सीबीटीचा जो पूर्वी दिलेला निर्णय लागू करण्यात यावा. पेन्शन कम्युटेशन आणि आरओसी सुविधा पुनश्च लागु करण्यात यावी. पेन्शन धारकांना सुविध व्हावी म्हणून जीवन प्रमाणपत्रची कार्यवाही स्थानिक बँक खात्यांद्वारे करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकाºयांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रकाश येंडे, भिमराव डोंगरे, पुंडलिक पांडे यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते.
न्यायिक मागण्यांसाठी पेन्शनधारक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 11:50 PM
न्यायिक मागण्यांसाठी गुरूवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक दिली. स्थानिक झाशी राणी चौकातून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचल्यावर तो पोलिसांनी अडविला.
ठळक मुद्देमोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक