शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:34 PM

नजिकच्या पळसगांव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांना कोणताही मोबदला न देता विद्युत टॉवर लाईनसाठी सागाची ६१ झाडे तोडण्यात आली. झाडे कापण्यास विरोध केल्यावरही न जुमानता पॉवर ग्रीडचे अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या संगणमताने झाडे तोडत शेतकरी राजू भट याला आत्महत्येस प्रवृत्त केले.

ठळक मुद्देमोबदला न दिल्याने उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : नजिकच्या पळसगांव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांना कोणताही मोबदला न देता विद्युत टॉवर लाईनसाठी सागाची ६१ झाडे तोडण्यात आली. झाडे कापण्यास विरोध केल्यावरही न जुमानता पॉवर ग्रीडचे अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या संगणमताने झाडे तोडत शेतकरी राजू भट याला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे दोषींविरु द्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार शेतकऱ्याच्या आईने पोलिसात केली होती. पण, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने पिडीत शेतकºयाने प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.राजू विश्वनाथ भट यांच्या शेत सर्वे नं. ६१५ व ६२४ या शेतातून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडची विद्युत टॉवर लाईन गेली आहे. या तारांखाली ५० ते ६० वर्षे जुनी वडिलोपार्जीत सागाचे ६१ झाडे होती. कंपनीने या झाडांचा कुठलाही मोबदला न देता नायब तहसिलदार बाबाराव तिनघसे व पॉवर ग्रीडच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकत ५ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता झाडांची कत्तल केली. यावेळी शेतात शेतकरी राजू व त्याची आई लिला भट उपस्थित असल्याने या दोघांनीही झाडे कापण्याला विरोध करुन कायदेशीर प्रक्रिया करण्याकरिता १० ते १२ दिवसांचा कालावधी मागितला होता. परंतू कालावधी ने देता झाडे कापण्याचा सपाटा सुरुच ठेवला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केले. राजूला अधिकाऱ्यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याने लिला भट यांनी सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच गावकऱ्यांच्यावतीने सिंदीचे ठाणेदार व पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले होते. सोबतच शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरिता विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन विशेष पोलीस महानिरिक्षक यांनाही निवेदन दिले. पण अजुनही गुन्हा दाखल केला नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या