लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या किरकोळ प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या शेतामध्ये बोंड आकाराने वाढत आहे. त्या बोंडामध्ये अळी आहे किंवा नाही हे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने तपासून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी चार किटकनाशकांचा वापर आॅक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे.आॅक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्यात क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्युपी १० लिटर पाण्यात २५ मि.ली. २० ग्रॅम वापरावे तसेच डिसेंबर महिन्यात फेनव्हलरेट २० टक्के ईसी किंवा सायपरमेथ्रिन १० टक्के ईसी १० लिटर पाण्यात १० मि.ली. वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय फवारणी करताना फवारणीचे औषध पात्या व फुलांमध्ये जाईल, याची काळजी घ्यावी. शिफारस केल्याप्रमाणे नेमकी मात्रा मोजून घ्यावी. तसेच काठी, डाव वापरूनच किटकनाशक हे पाण्यात निट मिसळून घ्यावे. मात्र चुकूनही हाताने द्रावण मिसळण्याची जोखीम पत्करू नये. किटकनाशकाची फवारणी करताना डोक्यावर नेहमी टोपी वापरावी व दिवसाचे सर्वात उष्ण वेळी फवारणी टाळावी. फवारणी करताना किमान गरज म्हणजे नाक, तोंड स्वच्छ कापडाने, रूमालाने, मास्कने झाकावे, लांब बाह्यांचा सदरा व लांब विजार अशी संरक्षक कपडे, चष्मा आदी घालावे. वाऱ्याच्या विरूध्द दिशेने फवारणी करू नये, फवारणी करताना धुम्रपान, तंबाखू तसेच खाद्य पदार्थ, खाने, पिणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.१० जणांना बाधावर्धा जिल्ह्यात औषध फवारणी करताना आतापर्यंत दोन शेतकरी, शेतमजूरांचा यंदा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी दहावर अधिक प्रकरणे विषबाधा झाल्याचे पुढे आले होते. त्यामुळे शासनाने फवारणी करताना दक्षता घेण्याची सुचना केली आहे.
बोंडअळी नियंत्रणासाठी जाहीर केले कीटकनाशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 9:59 PM
जिल्ह्यात सध्या किरकोळ प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या शेतामध्ये बोंड आकाराने वाढत आहे. त्या बोंडामध्ये अळी आहे किंवा नाही हे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने तपासून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी चार किटकनाशकांचा वापर आॅक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत करावा, ......
ठळक मुद्देआॅक्टोबर ते डिसेंबरचा काळ : फवारणी काळजीपूर्वक करा