आॅनलाईन लोकमतवर्धा : एखाद्या नैसर्गिक आपत्तीत घर नष्ट झाले तर एका क्षणात आपण उघड्यावर येतो. खुप आबाळ सहन करावी लागते. ही झाली मानवी समुहाच्या घराची गोष्ट. मात्र आपल्या भावना शब्दात न मांडूू शकणाऱ्या या सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाºया पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.प्रशासकीय स्तरावर जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येतो या माध्यमातून जनजागृती करण्यात येते, मात्र ती पुरेशी नसल्याच्या प्रतिक्रिया प्राणीमित्र व्यक्त करतात. प्रशासकीय यंत्रणेसह सामाजिक संस्थांचा यात सहभाग वाढविणे गरजेचा आहे. वर्धा शहर तसेच हिंगणघाट, आर्वी, देवळी येथे काही पर्यावरणपे्रमी संघटनांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांकरिता उन्हाळ्यात दाणापाण्याची सोय व्हावी म्हणून मातीचे भांडे वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यात वर्षागणिक नागरिकांचा सहभाग वाढत आहे. मात्र याची अंमलबजावणी कशी होते याचा आढावा घेणारी यंत्रणा येथे नाही. समाजात जोपर्यंत पक्ष्यांच्या वास्तव्याबाबत अधिवास आणि अस्तित्व टिकविण्यासाठी पक्ष्यांना संघर्ष करावा लागेल, असा सूर प्राणी मित्रांमधून उमटत आहे.बहार नेचर फाउंडेशन, पिपल्स फॉर अॅनिमल, नारायण सेवा मित्र परिवार, हिंगणघाट आदी संघटनांकडून जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधुन मातीच्या पात्रांचे वाटप करण्यात येते. घरोघरी हे पात्र लावुन त्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. पिपल्स फॉर अॅनिमलचे स्वयंसेवक मातीचे पात्र आणि पक्ष्यांसाठी घरटी दिलेल्यांचा आढावा घेतात. यात पक्षी आलेत का, त्यांनी अंडी घातली काय, याची पाहणी करुन नोंद घेतली जाते. यात प्रत्येक स्वयंसेवकांकडे दहा घरांची जवाबदारी देण्यात येते.चिमणी दिनाची सुरुवात२००६ मध्ये भारतात चिमणी या पक्ष्यांच्या संवर्धनाचे कार्य सुरू झाले. ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ चे मोहम्मद दिलावर यांनी सर्वप्रथम घरगुती चिमणीच्या संवर्धनाची गरज व्यक्त करुन तिला वाचविण्यासाठी मोहीम हाती घेतली. यानंतर शासकीय स्तरावर चिमणी दिन साजरा होऊ लागला. सर्वप्रथम अमेरिकेत ‘हाऊस स्पॅरो डे’ साजरा करण्यात आला.करूणाश्रमात जागतिक चिमणी दिवसवर्धा : वर्धेतील पीपल फॉर अॅनिमल्स ही संस्था बºयाच वर्षांपासून पशुपक्ष्यांच्या सेवेकरीता कार्य करीत आहे. २० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त मुक्त झालेल्या पिंजाºयांचे प्रदर्शन करूणाश्रम परिसरात भरविण्यात आले. मुक्त झालेल्या पक्ष्यांकरिता मुक्तांगणाची निर्मिती करुणाश्रम व्यवस्थेने केली असून दरवर्षी पक्षी दिनानिमित्त पक्ष्यांची घरटी व पाण्याची भांडी संस्थेमार्फत वितरित केली जाते.यावर्षी पक्षी दिनाचे औचित्य साधून पक्ष्यांकरिता पाण्याचे भांडे व पक्ष्यांचे घरटे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. वर्धा लोकसभेचे खा. रामदास तडस यांनी स्वत: पुढाकार घेत स्वहस्ते करूणाश्रमात येऊन लोकांना चिमण्यांचे घरटे व पाण्याच्या भांड्याचे वाटप केले. स्वत: झाडावर चिमण्यांकरिता घरटे लावले. या कार्यक्रमाकरिता पिपरी ग्रामपंचायत परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता अमित बाकडे, अभिषेक गुजर, रोहित कंगाले, व्यंकटेश जकात, भीमराव निवल, डॉ पियुषचंद्र धोबे, अजिंक्य काळे, आशिष गोस्वामी, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे यांनी सहकार्य केले.
वाढत्या सिमेंटीकरणाने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:40 PM
एखाद्या नैसर्गिक आपत्तीत घर नष्ट झाले तर एका क्षणात आपण उघड्यावर येतो. खुप आबाळ सहन करावी लागते.
ठळक मुद्देजागतिक चिमणी दिन विशेष : समाजात जागृतीची गरज; पक्षीमित्रांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन