लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यातील मित्र-मैत्रिणींना पैशाची गरज आहे, असे सांगून पैशाची मागणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात ऑनलाईन गंडविल्याच्या ७० च्यावर तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या असून सुमारे सात ते आठ लाखांची फसवणूक भामट्यांनी केल्याची माहिती सायबर सेलने दिली आहे.संचारबंदी काळात सर्व ठप्प असताना भामटे व्यापाऱ्यांना खरेदीच्या नावे लिंक पाठवून किंवा पाच रुपये, दहा रुपये डिपॉझिट करण्यास सांगून खात्याची माहिती घेतली जाते. ओएलक्स, आर्मी मॅनच्या नावाने महागडे वाहन, कमी किंमतीत मोबाईल विक्रीचे आमिष देऊन फसवणूक केली जात आहे.महिनाभरात सायबर सेलकडे अशा ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींचे पैसे परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे. फोन पे सर्व्हिस सेंटर वरून बोनस पॉर्इंट आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या नावाने ऐनीडेस्क सारखे अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ताबा स्वत: घेऊन खात्यातून रक्कम काढून घेत फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहे.आता सायबर भामट्यांनी नवीन फंडा वापरणे सुरू केले असून हॉटेलमालकांना जेवणाचा ऑर्डर देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू केला आहे. वर्ध्यातील एका हॉटेलमालकाला गंडविण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती आहे.ज्येष्ठ नागरिक, महिला लक्ष्यज्येष्ठ नागरिकांना मोबाईलवरून ई-व्यवहार करताना त्यातील खाचाखोचा ठावूक नसतात. भामटे त्याचाच फायदा घेतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाणे अडचणीचे होते. बºयाचदा एकटेदुकटे ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरू शकतो. त्या अज्ञानामुळे हे भामटे गंडा घालण्यात यशस्वी होतात. ई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातून केल्या जाणाऱ्या घोटाळ्याचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाईन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरून काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा ही रक्कम काढली गेली की त्याचा तपास करण्यस अडचणी येतात.गुन्हेगारांची चलाखीगुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्यायावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु, ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यातून इमेल, अॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळ्यात अडकविण्याचे तंत्र मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.पोलिसी मर्यादांचा गैरफायदाआॅनलाईन फसवणूक करणाºया गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोबाईलची मदत होते. मात्र, पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नयेत, यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या सीमकार्डचा वापर केला जातो. सीमकार्ड ज्याच्या नावे आहे त्याचा काहीच सहभाग नसतो. आॅनलाईनवरून फसवणूक करून आलेली रक्कम बँकेत वळती करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीस सोबत घेतले जाते. त्याच्या नावावर रक्क्म वळती करून त्यास कमिशनपोटी काही रक्कम दिली जाते. या बँक खातेदारापर्यंत पोलीस पोहोचतात परंतु, सूत्रधार वेगळाच असतो.बाजारात होते डेटा विक्रीबँकेमधून फोन आल्याचे भासवणाºया भामट्यांकडे आपल्या खात्याचा बºयापैकी तपशील असतो. बँकांकडून पुरविल्या जाणाºया क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात. आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो. वेगवेगळ्या ऑफरच्या नावागाली मोबाईल क्रमांक घेतले जातात. यातून मोबाईलचा डेटा मोठ्या प्रमाणात जमा होवून त्याची विक्री होते. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात.खातरजमा होत नाहीआपल्या बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, इ-मेलचा पीन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये,असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ज्ञ, पोलीस यंत्रणा वेळोवेळी सूचना करत असतात. परंतु, बँकेतून कॉल आल्याचे भासवणाऱ्या भामट्यांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा अॅपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही. म्हणून शहरात आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे.आर्थिक गुन्हे सर्वाधिकजिथे पैसा, तिथे धोका हे तत्त्व सायबर गुन्ह्यांमध्येही दिसून येते. ई-शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अॅपमधून होणाºया खरेदी-विक्री व्यवहारातून मोठ्या प्रमाणात पैसे हडप केले जातात. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर येते आहे. शहरात मागील आठ दिवसांमध्ये ८ ते १० जणांची फसवणूक झाली. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व उच्च शिक्षित आहेत.
सायबर भामट्यांची फिशिंग सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM
महिनाभरात सायबर सेलकडे अशा ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींचे पैसे परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे. फोन पे सर्व्हिस सेंटर वरून बोनस पॉर्इंट आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या नावाने ऐनीडेस्क सारखे अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ताबा स्वत: घेऊन खात्यातून रक्कम काढून घेत फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहे.
ठळक मुद्देसत्तरवर तक्रारी : तीन महिन्यांत तब्बल आठ लाखांनी केली फसवणूक