लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : संत सानिध्याने व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित वास्तव्य करायला मिळणे, हे खरोखर भाग्य आहे. संत मुंगसाजी महाराज यांच्या सहवासामुळे दहेगाव (मुस्तफा) ही भूमी अशीच पावन झाली असून या छोट्याशा गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला, असे भावनिक प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनर्जीवन मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर दिवे यांनी केले.आर्वी तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथे संत मुंगसाजी महाराज यांच्या बाराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होेते. यावेळी माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, सरपंच सुशीला ठाकरे, मंदिराचे अध्यक्ष पुरूषोत्तम ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्यात गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव ठाकरे, नत्थूजी पोटे, श्यामराव धोबे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहेगाव येथीलच मनोहर जाधव व गोपाळ खोब्रागडे यांचे गावात लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले. या दोघांना स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली. दहेगाव (मुस्तफा) येथील स्व. लक्ष्मीविनायक विद्यालयात आठ वर्षांपासून दहाव्या वर्गातील प्रथम, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी पुरस्कारांची परंपरा कायम राहणार असल्याचेही दिवे यांनी जाहीर केले. ज्येष्ठ बंधू स्व. मनोहर दिवे यांच्या स्मरणार्थ मुंगसाजी महाराज देवस्थानला ध्वनीक्षेपक संच देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तत्पूर्वी हभप राहुल महाराज कडू यांनी काल्याचे कीर्तन केले. प्रास्ताविक संस्थानचे सचिव मधू राठोड यांनी तर संचालन सागर ठाकरे यांनी केले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत, उपसरपंच संजू राठोड, ताराचंद टावरी, मोरेश्वर धोबे, आनंद चितोडे, नरेश एकोणकार, श्याम धोबे, दिनकर एकोणकार आदी उपस्थित होते.
मुंगसाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने दहेगाव (मु.) झाले तीर्थक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:42 PM
संत सानिध्याने व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित वास्तव्य करायला मिळणे, हे खरोखर भाग्य आहे. संत मुंगसाजी महाराज यांच्या सहवासामुळे दहेगाव (मुस्तफा) ही भूमी अशीच पावन झाली असून या छोट्याशा गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला,.....
ठळक मुद्देसुधीर दिवे : बारावा पुण्यतिथी महोत्सव