शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:29 PM

बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा वैताग : फवारणीनंतरही प्रत्येक बोंडात अळी

संजय बिन्नोड।लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकरी विजय पेटकर, दिलीप श्रीराव, श्रीकांत शिरे या शेतकºयांनी बी.टी. कपाशीची लागवड केली. पिकही वाढले, पात्या, फुले व्यवस्थीत आली. एका एका झाडाला ८० ते १०० बोंडे आहे; पण ही बोंडे गुलाबी अळीने पोखरलेली दिसली. त्यामुळे एकाही बोंडात कापूस नाही, केवळ गुलाबी अळीच आहे. कोणत्याही फवारणीला ही अळी जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषध विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळांचा प्रादुर्भाव झाला आहे. वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून बघताच त्यात गुलाबी अळी दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नावर होण्याचा शक्यता वर्तविली जात आहे.शुद्ध बोंड दाखवा हजार रुपये मिळवायेथील शेतकरी दिलीप श्रीराम यांनी तर बी.टी. कंपणीला व कृषी अधिकाºयांना एका कपाशीच्या झाडाला असलेल्या बोंडापैकी एक निरोगी बोंड दाखवा आणि माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस घ्या असेच आवाहन मी केले आहे.गुन्हा कधी दाखल होणारयेथील शेतकºयांनी बी.टी. कंपनीची या बियाण्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी अधिकाºयांनी शेतात जाऊन चौकशी केली. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाºयाकडे पाठविला. वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेत कंपनी विरोधात व ज्या कृषी केंद्रातून बियाणे घेतले त्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तशी तक्रार व चौकशी अहवाल देवळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे कळले. पण कुठलीही कार्यवाही नाही. या दोघांवरती गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकºयांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. यामुळे सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.यवतमाळात मदतीची कार्यवाही, वर्धेत मात्र केवळ चर्चाचमहसुल राज्यमंत्री तथा यवतमाळचे आ. संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कापसाचे किडलेले चुंगडीभर बोंड मंत्रालयात नेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी सचिव विजयकुमार सिंग यांच्यापुढे ठेवले. मंत्रालयात नाना राठोड यांनी बोंडअळीचे दाहक वास्तव मंत्र्यापुढे मांडले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यवतमाळसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मागितले. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारातून येथील शेतकºयांना मदत मिळविण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच असल्याचे दिसते. केवळ विकास कामांच्या नावावर टक्केवारीच्या गणितातच हे खूश असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकºयांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे.