शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

प्लाझ्मासाठी आता नागपूरपर्यंत पायपीट झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 5:00 AM

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरी कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असून यातूनच टेन्शन वाढत आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात १६८ कोरोना बाधित रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे होत असलेली ही क्षती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी जीवनदायी ठरत आहे.

ठळक मुद्देशासकीय रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटचा श्रीगणेशा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्या सातत्याने घसरत असतानाच आता आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, येथील शासकीय रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटचा सोमवारी (दि.७) श्रीगणेशा झाला. युनिटमध्ये कोरोनावर मात केलेल्या ३ कोरोना योद्धांचे प्लाझ्मा संकलीत करण्यात आले आहे. आता येथील रुग्णांना प्लाझ्माची गरज पडल्यास नागपूरपर्यंत पायपीट करावी लागणार नाही.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरी कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असून यातूनच टेन्शन वाढत आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात १६८ कोरोना बाधित रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे होत असलेली ही क्षती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी जीवनदायी ठरत आहे. यातूनच जिल्ह्याला प्लाझ्मा युनिटची परवानगी देण्यात आली. मागील महिन्यात यासाठी लागणारी मशिन व अन्य साहित्य मिळाले. प्लाझ्मा थेरपीसाठी येथील शासकीय रक्त केंद्रात विशेष युनिटही तयार करण्यात आले आहे. या प्लाझ्मा युनिटमध्ये सोमवारी (दि.७)  कोरोना मुक्त झालेल्या २ जणांचे प्लाझ्मा संकलीत करून युनिटचा श्रीगणेशा करण्यात आला. मंगळवारी (दि.८) १ प्लाझ्मा संकलीत करण्यात आला आहे. जिल्ह्यात आता प्लाझ्मा युनिट सुरू झाल्याने येथील गंभीर रूग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना नागपूरची दौड घ्यावी लागणार नाही. शिवाय कोरोनामुळे प्लाझ्मा अभावी आता रूग्णांचा जीव जाणार नाही, हे विशेष. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, विभाग प्रमुख डॉ. विनायक रूखमोडे, डॉ. दिलीप गेडाम, डॉ. ज्योती नेताम, डॉ.यादव, रक्त केंद्रप्रमुख डॉ. संजय चव्हाण, जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे, ट्रामाचे प्रतिनिधी अभिषेक मुके व अन्य उपस्थित होते. 

शासकीय रूग्णालयातील रूग्णांना नि:शुल्क जिल्ह्यातील रूग्णांना आता प्लाझ्मासाठी इतरत्र पायपीट करावी लागणार नाही. अशात दिलासादायक बाब म्हणजे, शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना नि:शुल्क प्लाझ्मा दिला जाणार आहे. तर खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी मात्र तेथील डॉक्टरांकडून एक अर्ज भरवून घेत ५५०० रूपये या शासनाने ठरवून दिलेल्या दरात प्लाझ्मा दिला जाणार आहे. यामुळे मात्र शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या व त्यातही गरीब रूग्णांसाठी हे अधिकच दिलासादायक ठरणार आहे. 

कोरोना योद्धाच आले कामी येथील प्लाझ्मा युनिटमध्ये संकलीत करण्यात आलेल्या ३ प्लाझ्मा युनिटमध्ये २ ओ पॉझिटिव्ह तर १ बी पॉझिटिव्ह आहे. विशेष म्हणजे, हे प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱे कोरोना योद्धाच कामी आले आहेत. त्याच असे की, हे प्लाझ्मा दान करणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील देशमुख, रक्त केंद्रातील तंत्रज्ञ अमित ठवरे व यशवंत हनवते आहे. कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यापासून या महामारी विरोधी लढ्यात उतरलेले हे कोरोना योद्धाच आता रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी पुन्हा प्लाझ्मा दान करून आपले युद्ध लढतच आहेत. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या