शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पिपरी (मेघे) ग्रा.पं. घेते नियमबाह्यपणे इमला कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:30 PM

नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.

ठळक मुद्देकारलाचे अतिक्रमण : वीजसह नळजोडणीचा आदेश कुणाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. शिवाय पिपरी (मेघे) ग्रा.पं. प्रशासन वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या कलम २ ला बगल देत सदर अतिक्रमण धारकांकडून इमला कर वसूल करीत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पक्के घर बांधण्यात आले आहेत. तसेच सदर घरांना वीज आणि नळ जोडणीही देण्यात आली आहे. परंतु, सदर जोडणीसाठीचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला, हेच सध्या न उलगडणारे कोड ठरत आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्वे क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व सर्वे क्रमांक ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली. त्याची नोंद महसूल विभागाने झुडपी जंगल म्हणून घेतली आहे. मात्र, जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरानजीकच्या याच वनविभागाच्या सुमारे ३० एकर जमिनीवर रामा राजू बागडे, महेंद्र मरजीवे, प्रेमिला प्रल्हाद उईके, सरिता रमेश उईके, लोकराम बाबुलाल बागडे, अनिता गजानन बास्टेकर, अर्चना राजेंद्र लाखे, हेमंत वडसकर, प्रकाश गव्हारकर, प्रल्हाद गणपत उईके व आणखी ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. पूर्वी या जागेवर झुडपी जंगल होते. परंतु, त्या परिसरातील अतिक्रमण धारकांसह काही अवैध वृक्ष कत्तल करणाऱ्यांनी सध्या येथील डेरेदार वृक्षही तोडल्याचे दिसून येते. शिवाय अनेकांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहेत. अतिक्रमण केलेल्या जागेवरील घरांना विद्युत पुरवठा करता येत नाही. शिवाय नळ जोडणीही देता येत नाही. मात्र, कारला येथील सदर वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण धारकांच्या घरी महावितरणकडून विद्युत जोडणी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने नळजोडणी देण्यात आली आहे. सदर प्रकार वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आला आहे. वन (संवर्धन) अधिनियम १९८० च्या कलम २ नुसार वनविभागाची जागा इतर वानीकी कामासाठी विनापरवानगी वापरता येत नाही; पण त्याला बगल दिली जात असल्याचे दिसून येते.आष्टीतील ‘ते’ प्रकरण भोवले होते तहसीलदारांनाआष्टी परिसरातील वनविभागाच्या एका जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांना विद्युत व नळ जोडणी देण्यासंदर्भात आदेश निर्गमित करणे चांगलेच भोवले होते. हा संपूर्ण प्रकार सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी घडला होता. तर कारला येथे कुणाच्या आदेशान्वये विद्युत आणि नळ जोडणी देण्यात आली असा प्रश्न वनविभागाच्या कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण